उद्या गडहिंग्लजपासून होणार प्रचार शुभारंभ…….
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या मेळाव्यांना प्रमुख नेतेमंडळी राहणार उपस्थित……
कोल्हापूर, दि. २४:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक ०५ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. निवडणुकीत छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारार्थ ऊद्या शनिवारपासून (दि.२५) ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ, पालकमंत्री व गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे प्रचार मेळावे सुरू होणार आहेत. तसेच; प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या या तालुकानिहाय मेळाव्याला या मेळाव्यांना माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार पी. एन. पाटील, आमदार डॉ. विनय कोरे, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार राजेश पाटील, माजी आमदार बजरंगअण्णा देसाई, माजी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी मंत्री भरमुअण्णा पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, माजी संचालक मानसिंगराव गायकवाड, गोकुळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या प्रचार मेळाव्यांच्या तालुकानिहाय दिवस, तारखा व वेळा अशा……..
शनिवार दि. २५ डिसेंबर २०२१ : सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० या वेळेत गडहिंग्लज तालुक्याचा मेळावा गडहिंग्लज शहरातील गिजवणे रोडवरील सूर्या सांस्कृतिक हॉलमध्ये होणार आहे.
बुधवार दि.२९ डिसेंबर २०२१ : सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० या वेळेत करवीर तालुका, कोल्हापूर शहर व गगनबावडा तालुका यांचा संयुक्त मेळावा होणार आहे. कागल तालुक्याचा मेळावा संध्याकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत होणार आहे.
गुरूवार दि. ३० डिसेंबर २०२१ : सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० या वेळेत हातकणंगले तालुक्याचा मेळावा होणार आहे. शिरोळ तालुक्याचा मेळावा संध्याकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत होणार आहे.
शुक्रवार दि. ३१ डिसेंबर २०२१ : सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० या वेळेत पन्हाळा तालुक्याचा मेळावा होणार आहे. शाहूवाडी तालुक्याचा मेळावा संध्याकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत होणार आहे.
शनिवार दि. ०१ जानेवारी २०२२: सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० या वेळेत राधानगरी तालुक्याचा मेळावा होणार आहे. भुदरगड तालुक्याचा मेळावा संध्याकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत होणार आहे.
रविवार दि. ०२ जानेवारी २०२२:सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० या वेळेत चंदगड तालुक्याचा मेळावा होणार आहे. आजरा तालुक्याचा मेळावा संध्याकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत होणार आहे.