कोल्हापूर, ता. 9 – महापालिकेच्या वतीने सराफ व्यावसायिकांना लागू केलेला फायर फी हटविल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ व्यावसायिकांतर्फे आज आनंद साजरा करण्यात आला.सराफ व्यावसायिकांना महापालिकेच्या वतीने फायर फी लागू करून ती वसूल करण्यासाठी वेळोवेळी विविध माध्यमातून मागणी केली जात होती. मात्र फायर फी चुकीच्या पद्धतीने लागू केली असून त्यासाठी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या निदर्शनास संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि संचालकांनी दाखवून दिले. त्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. निवेदनांच्या माध्यमातूनही महापालिकेला सांगितले होते. यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे व इतर पदाधिकाऱ्यांनीही मोठे सहकार्य केले.
दरम्यान, महापालिकेने फायर फी माफ केल्याचे पत्र सराफ संघास दिले. याचा आनंद साजरा करण्यासाठी भाऊसिंगजी रोड गुजरी कॉर्नर येथे संघाच्या वतीने फटाके फोडण्यासह साखर-पेढे वाटण्यात आले. यावेळी अध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), संचालक शिवाजी पाटील, संजय जैन, महेंद्र ओसवाल, ललित गांधी, प्रीतम ओसवाल, किशोर परमार, सुहास जाधव, विजय हावळ, राजेश राठोड, शीतल राठोड, मनोज राठोड, राजेंद्र पोतदार, शीतल पोतदार, राजू बारस्कर यांच्यासह सभासद उपस्थित होते.
सभासदांचे सत्कार – दरम्यान, संस्थेचे ज्येष्ठ सभासद जवाहर गांधी यांची श्री वासूपूज्य जैन श्वेतांबर ट्रस्ट, महावीर नगरच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, ओपन वॉटर मॅरेथॉनमधील विजेते दिनकर लाळगे व अमर पाटील या तिघांचा यावेळी सत्कार करण्यात आला.