कोल्हापूर ता.07 : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यामध्ये आजअखेर 302 टन गाळ उठाव करण्यात आलेला आहे. साधाणत: नाले सफाईचे 30 टक्के काम पुर्ण झाले आहे. पावसाळयापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सुचना प्रशसाक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी फेब्रुवारीमध्ये दिल्या होत्या. त्याप्रमाणे दिनांक 17 मार्च 2022 पासून महापालिकेच्यावतीने शहरामध्ये नाल्यातील गाळ काढण्याच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. हे काम 31 मे पुर्वी महापालिकेच्यावतीने पुर्ण करण्यात येणार आहे.
शहरामध्ये पोकलॅन्ड मशीनद्वारे एन.टी.सरनाईक नगर ते कात्यानी कॉम्प्लेक्स, एन.टी.सरनाईक नगर ते महालक्ष्मी हॉस्पीटल, रामानंदनगर ते महालक्ष्मी हॉस्पीटल, रामानंदरनगर ते जरगनगर शाळेच्या पाठीमागील बाजूपर्यंत, भारतनगर ते आर के नगर, मनोरा हॉटेल ते वर्षानगर, भारतनगर ते मनोरा हॉटेल या परिसरात मोठया नाल्यातील गाळ काढण्याचे काम पुर्ण झाले आहे. त्याचबरोबर जेसीबी मशीनीद्वारे शुगरमिल, हनुमान तलाव, पोलिस लाईन, कनेरकर नगर, सुर्वेनगर व क्रांतिसिंह नाना पाटीलनगर या परिसरातील 23 कच्च्या चाचींची सफाई करण्यात आली. महापालिका 60 सफाई कर्माचाऱ्यांच्या सहाय्याने शुगरमिल, कसबा बावडा पुर्व, हनुमान तलाव, लाईन बझार, लक्ष्मीविलास पॅलेज, पोलिस लाईन, सर्किट हाऊस, भोसलेवाडी, कदमवाडी, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, शासकीय मध्यवर्ती कारागृह, रायगड कॉलनी, कनेरकर नगर, सुर्वेनगर व क्रांतिसिंह नाना पाटीलनगर या 15 प्रभागांमध्ये 105 गटर चॅनेलची साफ सफाई करण्यात आली. हि सफाई 2 पोकलॅण्ड मशीन, 2 जेसीबी मशीन, 2 आयवा, 2 डंपर व 60 सफाई कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.