कागलमध्ये १३१ वी जयंतीनिमित्त केले अभिवादन…..
कागल, दि. १४:भारतीय राज्यघटना म्हणजे समानता, मानवता आणि मूलभूत मानवी हक्क यांचा दिपस्तंभ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या या घटनेमुळेच सबंध देशात समानता आहे, असे गौरवोद्गार गोकुळ दूध संघाचे संचालक व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी काढले.
कागलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त त्यांनी अभिवादन केले. डॉ बाबासाहेब आंबेडकरनगर येथील समाज मंदिरामध्ये डॉ. आंबेडकर यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच; जवळच असलेल्या शाहू उद्यानातील डॉ. आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आले. नगरसेवक विवेक लोटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, महापुरुषांच्या जयंतीला राजकारण सोडून कागल एकत्र येऊ शकतं, याचा मला अभिमान वाटतो. रोजगारवाढीला चालना देऊन बेरोजगारी कमी करण्यासाठी सर्वांनीच आपापल्या परीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
स्वागत व प्रास्ताविक नगरसेवक विवेक लोटे यांनी केले. माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे, भगवान कांबळे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार सौ. रुपाली सूर्यवंशी, कागल शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय चितारी, कागल नगरपालिकेचे प्रशासक पंडित पाटील, नामदेवराव पाटील -मळगेकर, शामराव पाटील, बाबासो नाईक, प्रवीण काळबर, नवाज मुश्रीफ, बॉबी माने, पंकज खलीप आदी प्रमुख उपस्थित होते.
नंतर श्री. मुश्रीफ यांनी गैबी चौक व श्रीमंत बापूसाहेब महाराज चौक येथे पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर शाहू कॉलनीतील जयंती कार्यक्रमाला भेट देऊन तिथेही अभिवादन केले.
कागल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ, शाहू समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे, बॉबी माने व इतर प्रमुख.