” अंकुरले काव्य ” बालकविता संग्रहाचे मालदीव येथे प्रकाशन
कोल्हापूर : स्व. राजकुमार काळभोर यांचें साहित्यिक योगदान बहुमोलाचे ” असे गौरवोद्गार मालदीव येथे
*डॉ. अलका नाईक, मुंबई यांनी संपादित केलेल्या बाल काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना जेष्ठ कवी अॅड बाळासाहेब तोरस्कर यांनी काढले.
*सहावे मराठी विश्व साहित्य संमेलन *मालदीव* बेटावर नुकतेच संपन्न झाले. यावेळी समाजसेविका *डॉ. अलका नाईक- मुंबई,* यांनी संपादित केलेल्या पुण्यातील कोरेगाव भिवर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या बालकवींच्या कवितांचा संग्रह ” *अंकुरले काव्य”* चे प्रकाशन ज्येष्ठ कवी बाळासाहेब तोरस्कर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते . हा कविता संग्रह “अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे” चे राष्ट्रीय संस्थापक स्वर्गीय राजकुमार काळभोर यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आला.
यावेळी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील यांच्या हस्ते सन्मानित होताना कवयित्री, साहित्यिका, संपादिका डॉ. अलका नाईक म्हणाल्या की मुलांच्या कोवळ्या मनात काव्याचे बीज अंकुरित करण्यासाठी आपण सर्व जेष्ठ साहित्यिकांनी कार्य केले पाहिजे. त्यातून एक वेगळाच आनंद मिळतो.याप्रसंगी उपस्थित अभिनेते श्री.मंगेश सातपुते, गझलकारा श्रीमती रेखा किंगर, कवयित्री सौ.फर्जाना डांगे प्रा. डॉ. अनिल काळबांडे, शब्द परिवार संयोजक श्री. संजय सिंगलवार, उपाध्यक्षा शशी डंभारे, आयोजिका सौ. वर्षा सिंगलवार, साहित्यिक श्री. सुहास मोरे इत्यादी सर्व मान्यवरांनी डॉ.नाईक व मुख्याध्यापिका सौ. संगीता लंघे यांच्या या प्रयत्नाचे खूप कौतुक केले.