पारपोलीच्या प्रकल्पग्रस्तांच्या घरमोजणीचा प्रश्न……
कोल्हापूर, दि.२०:
सर्फनाला प्रकल्पाच्या पारपोली ता. आजरा येथील घरांची मोजणी समाधानकारक झाली नसल्याची तक्रार प्रकल्पग्रस्तांची आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या मोजण्या नव्याने करा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी, अधिकारी व प्रकल्पग्रस्तांची ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
*”३० मे रोजी नव्याने मोजणी………”*
मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, ज्या प्रकल्पग्रस्तांची याआधी झालेल्या घरांच्या मोजणीबाबत तक्रार आहे. त्यांनी ३० मे रोजी गावात थांबावे. मोजणी विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या शंकांचे निरसन करतील.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, अमरजीत ढोकरे, अशोक मालप, तुकाराम गुंजाळ, प्रकाश शेटगे, अर्जुन शेटगे, एकनाथ शेटगे, प्रकाश शेटगे, अनिल सावंत, गणेश डोंगरे आदी प्रमुख उपस्थित होते.