गांधीनगर :प्रतिनिधी -ऑल इंडिया ट्रकर्स अँड ड्रायव्हर्स हेल्पलाइईन असोसिएशनच्या जॉईंट सेक्रेटरीपदी सरनोबतवाडी (ता.करवीर) येथील युवराज माने यांची निवड करण्यात आली आहे.
युवराज माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वाभिमान मालट्रक वाहतूकदार असोसिएशनची स्थापना केली आहे.
या संघटनेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर बाहेरील राज्यातील सर्व ट्रकची वाराई हमाली साफी मध्ये करून दिली आहे. तसेच भाडे वेळेवर न मिळणे पोचचे पैसे वेळेवर न मिळणे याबाबतीतही प्रश्न सोडवले आहेत. त्याच्या संघटनेमार्फत चार ते पाच कोटी रुपये गाडीवाल्यांचे साफी भाडे करून देऊन वाचवले आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन निवड करण्यात आली आहे.निवडीनंतर स्वाभिमान मालट्रक वाहतूकदार असोसिएशनच्या संचालक मंडळाकडून अभिनंदन होत आहे.