कोल्हापूर : येथील राजेंद्र दिवसे स्कुलच्यावतीने पहिला वार्षिक स्नेहसम्मेलन जिल्हा परिषद सोसायटी हॉल, जिल्हा परिषद कॉलनी याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सोसायटीचे सचिव एस. टी. बावडे सर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ते म्हणाले, राजेंद्र दिवसे स्कुल ही भावी आयुष्यात राजेंद्र दिवसे इंटरनॅशनल स्कुल म्हणून नावारूपाला आली पाहिजे. या स्कुलमधील प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले पाहिजे.
या वार्षिक स्नेहसम्मेलनात सर्व बालचमुंनी आपल्या नृत्याने सर्वांचे मने जिंकली. सर्व मुलांनी मोठ्या उत्साहात नृत्य सादर केले. देवा तुझ्या दारीं आलो…, मल्हारी…., मेरे मन मे शिवा…, कोकणी गीत.., लोकगीत… अशा अनेक गीत प्रकारामध्ये मुले थिरकताना दिसून आलीत.
यावेळी संस्थापक चेअरमन राजेंद्र दिवसे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी अर्चना ट्रस्टच्या अध्यक्षा प्रियांका दिवसे, सागर राणे, किशोर डांगे, अस्मिता पाटील, अशोक दिवसे आदी मान्यवर व पालक वर्ग उपस्थित होता.