कोल्हापूर, ता. १० – कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची आज झालेली वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीत झाली.कार्यकारी मंडळाच्या बदलानंतर पहिलीच सभा झाली. संस्थेच्या चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये सायंकाळी ४.३० वाजता अध्यक्ष राजेश राठोड यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना राठोड आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सभासदांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव प्रीतम ओसवाल, तेजस धडाम, संचालक शिवाजी पाटील, विजयकुमार भोसले, अशोककुमार ओसवाल, ललित ओसवाल, कुलदीप गायकवाड, संजय रांगोळे, किरण गांधी, कुमार ओसवाल, भैरू ओसवाल, सिद्धार्थ परमार, शीतल पोतदार, किरण नकाते, अनिल पोतदार, अनिल जामसांडेकर, वनेचंद राठोड, नरेंद्र ओसवाल, महादेव धडाम, संजय खद्रे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.