बँकेचे अध्यक्ष आमदार हसनसाहेब मुश्रीफ व संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या हस्ते वितरण
कागल, दि. २७:कागलमध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मंजूर केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना बँकेचे अध्यक्ष आमदार हसनसाहेब मुश्रीफ व संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या हस्ते कर्जमंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.
केडीसीसी बँकेच्यावतीने जिल्ह्यातील हजारो युवक मुलांना रोजगार करण्याची संधी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून करून दिल्याबद्दल सर्व मंजूर धारकांनी अध्यक्ष आमदार हसनसो मुश्रीफसाहेब व संचालक प्रताप उर्फ भैया माने यांचे आभार मानले.
यावेळी पांडुरंग बंडा पाटील – बिद्री, सुशांत आनंदा गुरव – मळगे खुर्द, कृष्णात निवृत्ती पाटील – कौलगे, विजय महादेव वाळवेकर – सावर्डे बुद्रुक, उदयसिंह एकनाथ पाटील – मौजे सांगाव, स्वप्निल कृष्णात फराकटे – बोरवडे, सुहासिनी उदयसिंग घाडगे – हिरलगे, ता गडहिंग्लज, सचिन यशवंत देसाई- हिरलगे, ता. गडहिंग्लज यांना मंजुरीपत्रांचे वाटप झाले.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज (बापू) पाटील, माजी पंचायत समिती सभापती रमेश तोडकर, सुनिल माळी, यशवंत गुरव, प्रविण सोनुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.