कोल्हापूर,: पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या आजरीज इको व्हॅली येथे २४ व २५ जून २०२३ रोजी जीपच्या (४ X ४) ऑफ रोडिंग स्पर्धांचे आयोजन केल्याची माहिती शेखर आजरी व ऋग्वेद आजरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, पश्चिम घाटापैकी महत्त्वाच्या असलेल्या गगनबावडा-वेसरफ येथे निसर्गाशी एकरूप होऊन, निसर्गाला हानी न पोहोचवता आजरीज इको व्हॅलीची उभारणी केली आहे. या पर्यटन केंद्राला पर्यटकांनी मोठी पसंती दिली आहे.
या स्पर्धेचे नियोजन आंतरराष्ट्रीय खेळाडू अश्विन शिंदे करीत आहेत. ते म्हणाले, दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये एकूण ५० जण सहभागी होतील. यामध्ये ब्लाईंड ड्राईव्ह, ट्रायल ड्राईव्ह, नाईट ड्राईव्ह, टाईम ट्रायल अशा विविध प्रकारांमध्ये स्पर्धा होतील. स्पर्धेमध्ये राज्यासह गोवा, कर्नाटक, दिव दमण येथील स्पर्धक सहभागी होणार आहेत. उदघाटन आणि सहभागी स्पर्धकांना मार्गदर्शन करण्याकरिता आयुब खान (गोकाक), रोहित गावडा आणि संतोष एच. एम. (हंपी) असे अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामांकित ऑफ रोडरही यावेळी उपस्थित राहतील. स्थानिकांना प्रोत्साहन, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व मदत अशा दुहेरी हेतूने होणाऱ्या या स्पर्धा आंतराष्ट्रीय निकषाप्रमाणे होतील. विजेत्यांना मेडल, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात येईल. येथून पुढे प्रत्येक शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या या स्पर्धांसाठी आजरीज इको व्हॅली स्पर्धेचा प्रमुख भाग आहे. स्पर्धेसाठी अकासा इव्हेंटचे संचालक अभिजित बोगर, कोल्हापूर इनलॅडर्स कोल्हापूर ऑफ रोडर, क्लब फोर बाय फोर, साई व्हिल्स, यश मोटर्स, आर.ओ.सी.ए, सातारा ऑफ रोडर, सह्याद्री ऑफ रोडर पुणे, ट्रेल हंटर, ए. बी. ग्रुप, कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब यांचे मोठे सहकार्य मिळणार आहे.
यावेळी कृष्णकांत जाधव, कार रेसर पल्लवी यादव, बाईक रायडर प्रशांत काशीद, डॉ. संदीप पाटील, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे उपाध्यक्ष विजय हावळ आदी उपस्थित होते.