नवनीत एज्युकेशनच्या ‘युवा’ या ब्रँडतर्फे नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ‘#बॅक टू स्कूल’ या कॅम्पनने करण्यात आली आहे. या औचित्याने ‘युवा’ने नावीन्यपूर्ण आणि विविध लेखनसामग्री उत्पादने सादर केली आहेत.
विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेत जाण्यास सज्ज होत असतानाच, ‘युवा’तर्फे ‘नयी क्लास, नयी स्टेशनरी’ हे त्यांना आकर्षित करणारे कॅम्पेन सादर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि जोश निर्माण करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांशी नाळ जोडणारी आणि नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याच्या भावना अभिव्यक्त करणारी फिल्म तयार करण्यासाठी ‘युवा’ने एएनटीएस डिजिटल या विश्वासार्ह डिजिटल मार्केटिंग एजन्सीशी सहयोग केला आहे.
‘युवा’चे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर आणि प्रवक्ते अभिजीत सान्याल यांनी या अभियानाविषयी त्यांचा दृष्टिकोन व्यक्त केला. ते म्हणाले, “विद्यार्थी त्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करत असताना त्यांच्यात उत्साह निर्माण करणे हे आमच्या ‘नयी क्लास, नयी स्टेशनरी’ या कॅम्पेनचे ध्येय आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला नवीन स्टेशनरी मिळाल्यावर झालेला आनंद या कॅम्पेनमधून सादर करण्यात आला आहे.”
नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यासाठी नवा स्टेशनरी सेट मिळाल्यावर एखाद्या मुलाला होणारा आनंद ‘युवा’च्या #बॅक टू स्कूल या कॅम्पेनच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. वरची इयत्ता, नवे शिक्षक, नवे मित्र-मैत्रिणी आणि नवा वर्ग शोधणे या सगळ्याच्या हलके दडपण आणणाऱ्या, उत्साहित करणाऱ्या, उत्कंठा वाढविणाऱ्या भावना या कॅम्पेनमध्ये समाविष्ट आहेत. विद्यार्थ्यांच्या या संक्रमणात ‘युवा’ स्टेशनरी हा त्यांचा विश्वासार्ह साथी आहे आणि त्यांच्यासमोर येऊ घातलेली आव्हाने आणि संधी यांना सामोरे जाण्याचे बळ हा ब्रँड त्यांना देतो.
वयाने लहान असलेल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आणि त्यांच्या शैक्षणिक उपलब्धिमध्ये स्टेशनरीचे किती महत्त्व असते याची ‘युवा’ला जाणीव आहे. या ब्रँडतर्फे दर्जेदार स्टेशनरी उत्पादनांची वैविध्यपूर्ण श्रेणी सादर करण्यात येते. यात वह्या, लाँग बुक्स, प्रॅक्टिकल बुक्स, चित्रकलेच्या वह्या, कंपास पेटी, पेन्सिल, खोडरबर आणि शार्पनर इत्यादी लेखनसामग्रीचा समावेश आहे. ‘युवा’ची स्टेशनरी उत्पादने असामान्य दर्जा आणि टिकाऊपणासाठी ओळखली जातात. अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे योग्य साधने असतील, याची खात्री या उत्पादनांमुळे होते. ही सर्व उत्पादने भारतभरातील स्टेशनरी दुकानांच्या विस्तृत नेटवर्कमध्ये आणि लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत