कोल्हापूर,: वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लि. या खाद्यपदार्थ आणि पेय क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एका कंपनीला नवरात्री उत्सवादरम्यान क्विकशेफ मसाल्यांच्या श्रेणीचे अनावरण करताना आनंद होत आहे. यामुळे कंपनीच्या उत्पादन श्रेणीत महत्त्वाच्या उत्पादनांचा समावेश होणार आहे. प्रगतीशील धोरणाचा अवलंब करत कंपनीने नाविन्यपूर्ण उत्पादनांसह बाजारपेठेत आघाडीचे स्थान मिळवण्याचे ठरवले आहे. या धोरणात्मक कृतीमुळे कंपनीच्या प्रवासात लक्षणीय टप्पा नोंदवला जाईल, कारण या निमित्ताने कंपनी नव्या, आकर्षक क्षेत्रात प्रवेश करत आहे.
क्विकशेफ मसाल्यांच्या श्रेणीचे अनावरण एका अविस्मरणीय सोहळ्यात वडोदरा येथे करण्यात आले. परम पूजनीय श्री धीरेंद्र शास्त्रीजी, बागेश्वर धाम सरकार यांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा आणखी खास ठरला. नवरात्रीदरम्यान त्यांच्या उपस्थितीने खाद्यपदार्थांच्या या नव्या प्रवासाला पवित्र वातावरणाची व अध्यात्मिक अनुभूतीची जोड मिळाली.
ही उत्पादन श्रेणी उपलब्ध करण्यामागचा धोरणात्मक दृष्टीकोन स्पष्ट करताना वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेस लि.च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौ. शीतल भालेराव म्हणाल्या, ‘मसाल्यांच्या क्षेत्रात केलेले पदार्पण ग्राहकांच्या बदलत्या चवी नाविन्यपूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याची आमची बांधिलकी दर्शवणारे आहे. दर्जेदार मसाल्यांना असलेली मागणी लक्षात घेत आम्ही केवळ सर्वोत्तम उत्पादने पुरवण्याचे ठरवले आहे. क्विकशेफ मसाल्यांच्या श्रेणीच्या माध्यमातून भारतीय मसाल्यांची समृद्ध आणि अस्सल चव संपूर्ण जगाला उपलब्ध करून देण्याचे व खाद्यप्रेमींना भारतीय स्वादाची अनुभूती देण्याचे आमचे ध्येय आहे. हा उपक्रम आमच्या भविष्यवेधी धोरणाचाच एक भाग असून ग्राहकांना नवीन व आकर्षक स्वाद उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
उच्च दर्जाच्या मसाल्यांना असलेली वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेसने नवरात्रीदरम्यान क्विकशेफ मसाल्यांची श्रेणी उपलब्ध केली आहे. पदार्थांची चव आणि सुगंध खुलवण्यासाठी क्विकशेफ मसाल्यांची श्रेणी १७ वैशिष्ट्यपूर्ण स्वादांपासून तयार करण्यात आली आहे. शाही बिर्याणी मसाला ते वैविध्यपूर्ण गरम मसाला आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या पाणीपुरी मसाल्यापर्यंते हे मसाले चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीस उतरतील. चार सोयीस्कर आकारांत याचे पॅकेजिंग करत वॉर्डविझार्डने प्रत्येक ग्राहक – मग तो नव्याने स्वयंपाक करणारा असो किंवा तज्ज्ञ शेफ, हे मसाले सर्वांना आवडतील अशा प्रकारे तयार केले आहेत.
क्विकशेफ मसाल्यांची श्रेणी या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ क्षेत्रात वॉर्डविझार्ड फुड्स अँड बेव्हरेजेसला आघाडीचे स्थान मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. या आकर्षक उत्पादनश्रेणीमुळे ग्राहकांचे समाधान होईल तसेच अनोख्या व अस्सल खाद्यपदार्थांची चव घेण्याची त्यांची इच्छा सदैव पूर्ण होईल.