इचलकरंजी -येथील शुभम आनंदा शिंदे यांनी मिस्टर इंडिया अल्टिट्यूड वर्ल्ड फिटनेस सुपर मॉडेल 2023 ग्लोबल मॉडेल इंडिया यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या मिस्टर अँड मिस इंडिया स्पर्धेमध्ये मिस्टर इंडियाअल्टिट्यूड वर्ल्ड फिटनेस सुपर मॉडेल 2023 हा किताब प्राप्त केला असून आता श्री.शिंदे यांची थायलंड येथे होणाऱ्या मिस्टर अल्टिट्यूड वर्ल्ड फिटनेस सुपर मॉडेल 2023 या स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली असून या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव स्पर्धक आहेत. नुकताच रिसोर्सेस प्रस्तुत सांगली फेस्टिवल मध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांना मिस्टर इंडिया ही पदवी व क्राऊन चितळे उद्योग समूहाचे मकरंद चितळे तसेच सौ.भक्ती चितळे आणि ग्लोबल मॉडेल इंडियाचे अमर सोनावणे सर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
यासाठी त्यांना आई-वडील, समस्त शिंदे फॅमिली त्याचबरोबर ग्लोबल मॉडेल इंडिया चे अमर सोनावणे तसेच इचलकरंजीचेच ऋषिकेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .थायलंड येथे होणाऱ्या स्पर्धेची ते सध्या तयारी करत आहेत. त्या ठिकाणी जवळपास 15 ते 20 देशांचे प्रतिनिधी येत असतात. त्यात भारतातून प्रतिनिधित्व करण्यासाठी शुभम शिंदे सज्ज झाले आहेत,अशी माहिती ग्लोबल मॉडेल इंडियाचे अमर सोनावणे यांनी दिली. थायलंड मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी मयुरेश अभ्यंकर तसेच फिटनेस ट्रेनिंगसाठी प्रविण खोंद्रे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.