येथील कोल्हापूर इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा.सई हर्षद ठाकूर यांना बेळगाव येथील विश्वेश्वरय्या टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीकडून केमिकल इंजिनिअरिंग मध्ये पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी ‘इन्व्हेस्टिगेशन ऑफ स्प्रे कुलिंग कॅरेक्टरिस्टीक्स फॉर लो हिट फ्लक्स ऍप्लिकेशन्स’ या विषयावर प्रबंध सादर केला होता.
या संशोधनाला जर्मनी येथे पेटंटही मिळाले आहे.डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेळगाव या संस्थेचे डॉ. उमेश देशण्णवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन पूर्ण केले. सौ. ठाकूर यांना के.आय.टी. संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री. साजिद हुदली, सचिव श्री. दीपक चौगुले ,अन्य विश्वस्त तसेच संचालक डॉ. मोहन वनरोट्टी,बायोटेक विभाग प्रमुख डॉ.पल्लवी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.