पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती
*कसबा सांगाव. दि. ९:*
*महाशिवरात्रीच्या निमित्ताने कसबा सांगाव चे ऐतिहासिक श्री. भवानी शंकर मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न होत असल्याचा मला मनापासून चा आनंद असल्याच्या भावना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या.
कसबा सांगाव ( ता.कागल ) येथे पालकमंत्री नामदार हसनसाहेब हसन मुश्रीफ यांच्या फंडातून श्री भवानी शंकर मंदिर परिसराचा सुशोभीकरण व मठाची विहिर बांधकाम आदी विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील होते.यावेळी बोलताना नामदार श्री. मुश्रीफ म्हणाले, गेल्या काही वर्षाची ग्रामस्थांची मागणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने भक्तिमय वातावरणात पूर्णत्वास जात आहे. भगवान शंकर हे जागृत देवस्थान आहे. त्यांचा स्वभाव भोळा असला तरी चुकीच्या गोष्टीसाठी ते तिसरा डोळा उघडतात. त्यांचीच इच्छा होती हे मंदिर आमच्या हातून पूर्णत्वास जावे. यासाठी आवश्यक तो सर्व निधी दिला आहे. अजूनही निधीची कमतरता पडल्यास मी मागे हटणार नाही.
श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, लोकांनी दिलेल्या सत्तेचा वापर मी सर्वसामान्यांच्या कामाला पहाटेपासूनच प्राधान्य देऊन करण्याचा प्रयत्न करत आहे. सार्वजनिक विकास कामाबरोबर वैयक्तिक योजनाही फाउंडेशनच्या माध्यमातून चालना देत आहे. त्याचा लाभ सर्वसामान्य घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षपदावरून बोलताना गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील म्हणाले, सातत्याने गोरगरिबांच्या कामाला चालना देऊन सार्वजनिक विकासाचा डोंगर उभ्या करणाऱ्या नामदार मुश्रीफ यांच्या मागे आपण ठाम राहूया.प्रास्ताविकात गटनेते राजेंद्र माने यांनी विरोधकांनी या मंदिराच्या कामाची कुदळ चार वेळा मारली, मात्र नामदार मुश्रीफ यांनीच काम पूर्णत्वास नेले आहे. विरोधक काम करत येत नाहीत व करूही देत नाहीत, अशी टीका केली.*स्वागत जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष अनिल चावरे यांनी केले. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने माजी सरपंच रणजीत कांबळे , श्रीमती वंदना माने अजित शेटे , दयानंद स्वामी , उपाध्यक्ष सागर चव्हाण आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
कसबा सांगाव येथील श्री भवानी शंकर मंदिराच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी पालकमंत्री हसन मुश्रीफ , युवराज पाटील , भैय्या माने आदी.*
=================