ईटी नाऊ बेस्ट हेल्थकेयर ब्रँड अवॉर्ड्समध्ये १००० पेक्षा जास्त ब्रँड्समधून ही निवड करण्यात आली आहे
कोल्हापूर , ८ ऑगस्ट २०२४: अमृतांजन हेल्थकेअर, भारताच्या आरोग्य सेवा उद्योगात १३१ वर्षांचा इतिहास असलेली उद्देश-चालित आणि नाविन्यपूर्ण संस्था आहे ,ईटी नाऊ बेस्ट हेल्थकेअर ब्रँड इव्हेंटच्या ७ व्या आवृत्तीत सर्वोत्कृष्ट हेल्थकेअर ब्रँड म्हणून ओळखली गेली. देशभरातील १,००० इतर हेल्थकेअर ब्रँड्समध्ये एक बारकाईने आणि कठोर निवड प्रक्रियेनंतर ही ओळख मिळाली. ही ओळख विशेषतः प्रतिष्ठित आहे कारण केवळ मर्यादित ब्रँडच निकष पूर्ण करू शकतात.
अमृतांजन हेल्थकेयरच्या पोर्टफोलिओमध्ये आरोग्य देखभालीशी संबंधित विविध विभागांमधील अनेक वेगवेगळ्या उत्पादनांचा समावेश आहे. विज्ञान आणि आयुर्वेद यांचा अनोखा मिलाप घडवून आणत या ब्रँडने क्लिनिकल ट्रायल्समध्ये यशस्वी ठरलेली, आराम मिळवून देणारी प्रभावी उत्पादने सादर केली आहेत. नावीन्य हा अमृतांजनच्या यशाचा एक प्रमुख स्तंभ आहे. रोल-ऑन पेन रिलीफ, पहिला हायड्रोजेल पेन पॅच यासारखे वापरायला अतिशय सोपे आणि सुविधाजनक फॉरमॅट सादर करून अमृतांजनने वेदनांवर उपचार करून घेणे सर्व ग्राहकांसाठी अगदी सहजशक्य बनवले आहे.
ग्राहकांच्या बदलत्या गरजा ध्यानात घेऊन, त्या पूर्ण करण्यासाठी डिजिटायझेशन व तंत्रज्ञानाचा स्वीकार करून अमृतांजन वेगाने विकास करत आहे. डिजिटल परिवर्तनासाठी हा ब्रँड ई-कॉमर्स, थेट ग्राहकांना विक्री करणाऱ्या प्लॅटफॉर्म्समध्ये लक्षणीय गुंतवणूक करत आहे, सोशल मीडियामार्फत जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे, ‘कॉम्फी पिरियड ट्रॅकर’ सारखी ऍप्स आणून ग्राहकांसोबतचे नाते अधिकाधिक दृढ करण्यासाठी अमृतांजन सातत्याने प्रयत्नशील आहे.
ईटी नाऊ बेस्ट हेल्थकेयर ब्रँड पुरस्कारातून अमृतांजन हेल्थकेयरची उत्कृष्टता व जगभरातील ग्राहकांच्या आरोग्य देखभालीशी संबंधित विविध गरजा पूर्ण करण्याप्रतीची बांधिलकी दिसून येते. विश्वसनीय उत्पादनांची विशाल श्रेणी प्रस्तुत करताना अमृतांजनने सर्वोत्तम देखभाल व सातत्यपूर्ण नावीन्य पुरवण्यावर सर्वाधिक भर दिला आहे.
अमृतांजन हेल्थकेयर लिमिटेडचे चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री एस शंभू प्रसाद यांनी सांगितले, “ईटी नाऊ बेस्ट हेल्थकेयर ब्रँड्स अवॉर्ड्समध्ये सन्मानित केले जाणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. उत्कृष्टता साध्य करण्यासाठी आम्ही करत असलेले निष्ठापूर्वक प्रयत्न आणि आमच्या ग्राहकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणू शकतील अशी अतुलनीय आरोग्य देखभाल उत्पादने पुरवण्याप्रती आमची बांधिलकी या पुरस्कारातून अधोरेखित झाली आहे. आमची कुशल टीम, आमच्यावर विश्वास ठेवणारे ग्राहक आणि सहयोगी यांचे आम्ही आभारी आहोत, आमच्या यशामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. भविष्यात देखील आम्ही असेच नावीन्य घडवत राहू आणि आरोग्य देखभालीमध्ये सर्वोच्च दर्जाची उत्पादने आणत राहू, प्रत्येक घराघरात विश्वासाचे नाव ही आमची ओळख कायम राहील याची काळजी घेऊ.”
वेदनांवरील उपचारांच्या बरोबरीनेच अमृतांजन हेल्थकेयरने इतरही अनेक विविध प्रकारची उत्पादने सादर केली आहेत – सर्दी व नाक चोंदण्यावर उपाय (रिलीफ), पेये (इलेक्ट्रो + रिहायड्रेट), महिलांसाठी स्वच्छतेची उत्पादने (कॉम्फी) आणि आरोग्य व स्वच्छता (स्टॉप इच).