कोल्हापूर-नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात आणि आनंदात करण्यासाठी प्रेक्षकांवर अफाट प्रेम मिळवलेला कार्यक्रम “महाराष्ट्राची हास्यजत्रा” पुन्हा एकदा हास्याची धमाल घेऊन परत येत आहे. महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या शोचा नवीन सीझन ५ जानेवारीपासून दर सोम आणि मंगळवार रात्री ९ वा. सोनी मराठी वर प्रदर्शित होणार आहे. “आपल्या हसण्याचा नवा रिजन कारण येतोय नवा सिझन!”
नव्या वर्षात नवा सीझन – धमाल दुप्पट, एंटरटेनमेंट दुप्पट! नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला हास्याचा ताजातवाना डोस देण्याची जबाबदारी या शोने पुन्हा एकदा उचलली आहे. गेल्या अनेक सीझन्सपासून कुटुंबांना एकत्र बसून बिनधास्त हसण्याचं कारण देणाऱ्या या शोचे कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक नव्या ऊर्जेसह सज्ज झाले आहेत.
या सीझनमध्ये प्रेक्षकांसाठी खास असे नव्या संकल्पनेवर आधारित नवे स्किट्स, नवीन व्यक्तिरेखा आणि खास नवीन ट्विस्ट आणि अर्थातच प्रेक्षकांच्या मनात घर केलेली मराठमोळी विनोदाची शैली, नवे विषय आणि नव्या प्रहसनासह हा सीझन आणखी भव्य, रंगतदार आणि मनोरंजक ठरेल अशी खात्री प्रेक्षकांना आहे. प्रेक्षकांचा आवडता ओंकार भोजने याने नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात पुनरागमन केले होते. त्याच्या नवीन प्रहसनाची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते आणि ततेच नवे विषय घेऊन ओंकार ५ जानेवारीपासून आपल्या भेटीस येत आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. दिवसातील सगळी धावपळ, ताणतणाव विसरून लोक या शोसोबत मनमुराद हसतात. त्यामुळेच नवीन वर्षात शोच्या पुनरागमनाची घोषणा होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण आहे.
या शोमधील कलाकारांची केमिस्ट्री, त्यांचे लयबद्ध पंचेस, लोकजीवनाशी जोडणारे विषय आणि मानवी भावनांना स्पर्श करणारे विनोद हे सगळं असल्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचा पसंतीस पडत आहे. नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात आणि नवीन उत्साह. याच उत्साहाला सलाम करत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा नवा सीझन प्रेक्षकांसमोर येत आहे. या कार्यक्रमाचा प्रयत्न नेहमीच कुटुंबांना एकत्र आणणे, हास्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा आहे. नवीन सीझन प्रेक्षकांना दुप्पट मजा आणि दुप्पट एंटरटेनमेंट देईल.
५ जानेवारीपासून, दर सोम–मंगळवार, रात्री ९ वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – फक्त सोनी मराठीवर! नव्या वर्षाची सुरुवात नव्या हसण्याने करा… कारण येतोय आपल्या हसण्याचं कॉमन रिजन! नव्या वर्षात, नव्या जोमाने सुरु होणार नवा सिझन!

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर