कोल्हापूर, :भारतीय युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या स्मार्टफोन ब्रँड रियलमीने आज रियलमी १६ प्रो सिरीजचे अधिकृत अनावरण केले. प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमध्ये बेंचमार्क ठरलेल्या या सिरीजमध्ये रियलमी १६ प्रो प्लस आणि रियलमी १६ प्रो हे दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. परफॉर्मन्स, डिझाइन आणि पोर्ट्रेट इमेजिंगमध्ये नवे मापदंड स्थापित करण्यावर कंपनीचा भर आहे.
रियलमी १६ प्रो प्लसमध्ये इंडस्ट्रीतील पहिले बायो-बेस्ड ऑरगॅनिक सिलिकॉन बॅक कव्हर, २०० एमपी लुमा कलर पोर्ट्रेट कॅमेरा, ३.५x पेरिस्कोप लेन्स, स्नॅपड्रॅगन ७ जेन ४ चिपसेट आणि ७००० mAh टायटन बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन मास्टर गोल्ड, मास्टर ग्रे आणि भारतासाठी खास कॅमेलिया पिंक रंगात उपलब्ध असून किंमत ₹३५,९९९ पासून सुरू होते.
रियलमी १६ प्रो मध्ये २०० एमपी कॅमेरा, मीडियाटेक डायमेन्सिटी ७३००-मॅक्स ५जी चिपसेट आणि ७००० mAh बॅटरी असून याची सुरुवातीची किंमत ₹२८,९९९ आहे. यासोबतच कंपनीने रियलमी बड्स एअर ८, रियलमी पॅड ३ आणि रियलमी स्मार्ट पेनही सादर केले आहेत.
रियलमी १६ प्रो सिरीजचे अनावरण
RELATED ARTICLES







