Wednesday, January 28, 2026
Home अर्थ-उद्योग  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे महानगर पालिका निवडणुकीतील...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे महानगर पालिका निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयाचे धुरंधर शिल्पकार

Advertisements

महापालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या प्रचाराला राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे पाठिंबा व्यक्त केल्याचे चित्र निकालांमुळे स्पष्ट झाले आणि त्याच बरोबर शहरी मतदाराची अचूक नस माहिती असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या विचारधारेसोबत राहण्याच्या आवाहनाला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे निकालांवरून दिसले. मागील वर्षी जानेवारीत रविंद्र चव्हाण यांनी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर राज्यात दीड कोटी प्राथमिक सदस्यांचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले होते तिथेच ते अर्धी लढाई जिंकल्याचे आज या दणदणीत विजयाने स्पष्ट झाले.
भाजपा हा धोरण आखणारा आणि धोरण राबविणारा पक्ष आहे. निवडणुकांचे नियोजन, तिकीट वाटप, सभांचे नियोजन याबरोबरच विरोधी पक्षांना जोखण्याचे कसब “देवेंद्र आणि रविंद्र” या भाजपाच्या जोडीकडे आहे. सरकार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश पक्ष यातील समन्वयाचे हे यश असल्याने हा अभूतपूर्व विजय मिळाल्याचे विश्लेषण राजकीय पंडितांनी केले आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे शीर्षस्थ नेतृत्त्व म्हणून पक्षासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात बोलून दाखवलेली. त्यांच्या रूपाने भाजपाला रस्त्यावर उतरून आंदोलन केलेला आणि मातीशी जोडलेला कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून मिळाला. निवडणूक काळातील वक्तव्याने, पेहरावाने झालेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या टीकेमुळे रविंद्र चव्हाण बिलकुल विचलित झाले नाहीत. उलट त्यांनी विरोधकांना जनतेसाठी अनावश्यक अशा विषयात गुंतवून ठेवून, भाजपासाठी विजयाची वाट अधिक सुकर केल्याचे स्पष्ट झाले. विरोधकांनी चव्हाण यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेला जनतेच्या दृष्टीने कवडीमोल किंमत असल्याचेही या निमित्ताने दिसले. २५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत रविंद्र चव्हाण त्यांच्यावर झालेल्या प्रत्येक टीकेनंतर एक पाऊल पुढे जातानाच दिसले. याचे कारणच कायम संघर्ष करून यश संपादन केलेला रविंद्र चव्हाण यांच्यासारखा नेता महाराष्ट्रातील जनतेने अजून नीटसा पाहिलेला वा ओळखलेला नाही आणि राजकीय निरीक्षकांनी अजून अभ्यासलेला नाही. रविंद्र चव्हाण हे अत्यंत मुरलेले आणि मुरब्बी राजकारणी म्हणून महाराष्ट्रात आजच्या भाजपाच्या विजयाने उदयास आलेले आहेत हे दिसले.
देवेंद्र फडणवीस यांना रविंद्र चव्हाण यांची बलस्थानं माहिती आहेत. पक्षासाठी २४ तास समर्पित अध्यक्ष म्हणून त्यांचे महत्त्व फडणवीस जाणून आहेत. रविंद्र चव्हाण यांचा शहरी महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव आणि त्यांची कायम “निवडणूक सिद्धता ” म्हणजेच इलेक्शन रेडीनेस अशा स्वरूपाची कार्यशैली देवेंद्र फडणवीस ओळखून आहेत. त्यातच अडीच वर्षे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना अवघा महाराष्ट्र पिंजून काढत रविंद्र चव्हाण यांनी खात्याच्या माध्यमातून विकासकामे करताना संपूर्ण महाराष्ट्रात हेरलेली आणि पेरलेली माणसं ही भाजपासाठी महत्त्वाची ठरली असं दिसत आहे. आजच्या भाजपाच्या दैदिप्यमान विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अष्टपैलू नेतृत्व जितके प्रखरतेने माध्यमांसमोर दिसलं तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा नियोजनाचा आवाका महाराष्ट्राच्या लक्षात येईल जेव्हा संपूर्ण विजयाची आकडेवारी प्रकाशित होईल.

RELATED ARTICLES

कोल्हापूर महापौर, उपमहापौर निवड ६ फेब्रुवारीला

*निवडीबाबत आज महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत होणार खलबते* कोल्हापूर: कोल्हापूर महापालिका महापौर, उपमहापौर निवडीच्या तारखेची उत्सुकता संपली. पुणे विभागीय आयुक्तांनी कोल्हापूर महापौर व उपमहापौर...

स्कोडा ऑटोने भारतात नवीन कुशाक सादर केली

कोल्हापूर, २२ जानेवारी २०२६: स्कोडा ऑटो इंडियाने भारतात अपडेटेड नवीन कुशाक एसयूव्ही सादर केली आहे. इंडिया 2.0 धोरणांतर्गत ही कंपनीची महत्त्वाची कार असून, युरोपियन...

इन्सुलिन उपचारांच्या भावनिक परिणामांवर मात करणे: भारतातील मधुमेहाच्या व्यवस्थापनातील अडथळे दूर करण्यासाठी तज्ञांनी नाविन्यपूर्ण जनजागृतीचे आवाहन केले आहे

शिक्षण देत, सक्षमीकरण करत आणि गैरसमज दूर करत मधुमेह उपचारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सिप्लाने #InhaleTheChange मोहीम सुरू केली आहे. , या आकड्यांमुळे वैद्यकीय आव्हानांचा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर महापौर, उपमहापौर निवड ६ फेब्रुवारीला

*निवडीबाबत आज महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत होणार खलबते* कोल्हापूर: कोल्हापूर महापालिका महापौर, उपमहापौर निवडीच्या तारखेची उत्सुकता संपली. पुणे विभागीय आयुक्तांनी कोल्हापूर महापौर व उपमहापौर...

स्कोडा ऑटोने भारतात नवीन कुशाक सादर केली

कोल्हापूर, २२ जानेवारी २०२६: स्कोडा ऑटो इंडियाने भारतात अपडेटेड नवीन कुशाक एसयूव्ही सादर केली आहे. इंडिया 2.0 धोरणांतर्गत ही कंपनीची महत्त्वाची कार असून, युरोपियन...

इन्सुलिन उपचारांच्या भावनिक परिणामांवर मात करणे: भारतातील मधुमेहाच्या व्यवस्थापनातील अडथळे दूर करण्यासाठी तज्ञांनी नाविन्यपूर्ण जनजागृतीचे आवाहन केले आहे

शिक्षण देत, सक्षमीकरण करत आणि गैरसमज दूर करत मधुमेह उपचारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सिप्लाने #InhaleTheChange मोहीम सुरू केली आहे. , या आकड्यांमुळे वैद्यकीय आव्हानांचा...

मराठी झी ५ च्या वतीने आगामी ओरिजनल सिरीज देवखेळचा ट्रेलर प्रसिद्ध – पौराणिक कथा, गुन्हा आणि न्यायची सरमिसळ

चंद्रकांत लता गायकवाड दिग्दर्शित आणि निखिल पालांडे तसेच गौरव रेळेकर लिखित, सिने मास्टर्स प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित, कोकणी लोककथेत रुजलेला हा चित्तवेधक मानसशास्त्रीय...

Recent Comments