टाटा मोटर्सकडून 17 नेक्‍स्‍ट-जनरेशन ट्रक्‍स लाँच; सुरक्षितता, लाभक्षमता आणि प्रगतीसाठी नवीन मानक स्‍थापित केले

कोल्हापूर: भारतातील ट्रकिंग क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल उचलत टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक व गतीशीलता सोल्‍यूशन्‍स प्रदाता कंपनीने आज आपल्‍या 17 ट्रक्‍सचा नेक्‍स्‍ट-जनरेशन पोर्टफोलिओ लाँच केला. हे ट्रक्‍स ७ टन ते ५५ टन कन्फिग्‍युरेशन्‍समध्‍ये उपलब्‍ध आहेत. यासह सुरक्षितता, नफा व प्रगतीमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित केले आहे. या सर्वसमावेशक लाँचमध्‍ये ऑल-न्‍यू अझुरा सिरीज, अत्‍याधुनिक टाटा ट्रक्‍स ईव्ही श्रेणी आणि प्रस्‍थापित प्राइमा, सिग्‍ना व अल्‍ट्रा प्‍लॅटफॉर्म्‍समधील मोठ्या अपग्रेड्सचा समावेश आहे. जागतिक सुरक्षितता मानकांचे (ECE R29 03) काटेकोरपणे पालन करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले हे ट्रक्‍स उत्‍पन्‍न क्षमता वाढवतात, एकूण मालकीहक्‍क खर्च कमी करतात आणि वेईकल अपटाइम वाढवतात, ज्‍यामुळे वाहतूकदारांना मोठे यश मिळते.
नवीन ट्रक्स लाँच करत टाटा मोटर्स लि.चे एमडी व सीईओ श्री. गिरीश वाघ म्‍हणाले, “भारतातील ट्रकिंग क्षेत्रात झपाट्याने परिवर्तन होत आहे, ज्‍याला प्रगतीशील राष्‍ट्रीय धोरणे, आधुनिक पायाभूत सुविधा आणि सुरक्षित, अधिक स्‍वच्‍छ व अधिक कार्यक्षम लॉजिस्टिक्‍ससाठी वाढत्‍या मागणीने गती दिली आहे. टाटा मोटर्स मापदंड स्‍थापित करण्‍यामध्‍ये नेहमी अग्रस्‍थानी आहे, जे उद्योगाच्‍या भविष्‍याला आकार देतात. लाँच करण्‍यात आलेल्‍या आमच्‍या नेक्‍स्‍ट-जनरेशन पोर्टफोलिओमध्‍ये ऑल-न्‍यू अझुरा सिरीज, दोन प्रगत उच्‍च-कार्यक्षम पॉवरट्रेन्‍स, आमच्‍या नवीन आय-एमओईव्‍ही आर्किटेक्‍चरवर आधारित भारतातील शून्‍य-उत्‍सर्जन इलेक्ट्रिक ट्रक्‍स व ट्रिपर्सची व्‍यापक श्रेणी, युरोपियन मानक केबिन्‍स व उद्योग-अग्रणी सुरक्षितता वैशिष्‍ट्यांमध्‍ये मोठ्या प्रमाणात अपग्रेड्स, अधिक पेलोड क्षमता आणि इंधन कार्यक्षमतेचा समावेश आहे, जे सर्व फ्लीट एज डिजिटल सेवांसह एकीकृत करण्‍यात आले आहेत. यासह आम्‍ही या वारशाला अधिक पुढे नेत आहोत. ‘बेटर ऑल्‍वेज’ तत्त्वामधून प्रेरित आमची नाविन्‍यतेप्रती अविरत मोहिम, स्‍थानिकीकरणाप्रती दृढ कटिबद्धता आणि ग्राहकांना यशस्‍वी करण्‍यावरील निरंतर फोकस ‘आत्‍मनिर्भर भारत’च्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न आहेत, ज्‍यामुळे शाश्वत गतीशीलतेमध्‍ये नेतृत्‍व करण्‍याप्रती भारताचा आत्‍मनिर्भरपणा व महत्त्वाकांक्षा अधिक दृढ झाली आहे.”

  • Related Posts

    अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

    कोल्हापूर, 27 जुलै 2026 – अल्ट्राव्हायोलेटने आज कोल्हापूरमध्ये आपल्या नवीन यूव्ही स्पेस स्टेशनच्या उद्घाटनाची घोषणा केली असून देशभरातील आपल्या रिटेल आणि सेवा नेटवर्कच्या विस्तारात महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. हा…

    स्कोडा ऑटो इंडियाकडून स्लाव्हिया मोंटे कार्लोसाठी दोन नवीन ड्युअल-टोन रंग पर्याय शिमला ग्रीन आणि स्टील ग्रे रंगांमध्ये लिमिटेड एडिशन; केवळ २०० युनिट्स उपलब्ध

    कोल्हापूर, : स्कोडा ऑटो इंडियाने आपल्या लोकप्रिय स्लाव्हिया मोंटे कार्लो सेडानसाठी दोन नवीन ड्युअल-टोन रंग पर्याय – शिमला ग्रीन आणि स्टील ग्रे – सादर केले आहेत. हे दोन्ही रंग मर्यादित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

    अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत  महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

    स्कोडा ऑटो इंडियाकडून स्लाव्हिया मोंटे कार्लोसाठी दोन नवीन ड्युअल-टोन रंग पर्याय शिमला ग्रीन आणि स्टील ग्रे रंगांमध्ये लिमिटेड एडिशन; केवळ २०० युनिट्स उपलब्ध

    स्कोडा ऑटो इंडियाकडून स्लाव्हिया मोंटे कार्लोसाठी दोन नवीन ड्युअल-टोन रंग पर्याय शिमला ग्रीन आणि स्टील ग्रे रंगांमध्ये लिमिटेड एडिशन; केवळ २०० युनिट्स उपलब्ध

    बायरकडून भारतात अल्पभूधारक शेतकऱ्यांना अत्याधुनिक कीड व्यवस्थापनाद्वारे मदत करण्यासाठी ट्रान्स सादर

    बायरकडून भारतात अल्पभूधारक शेतकऱ्यांना अत्याधुनिक कीड व्यवस्थापनाद्वारे मदत करण्यासाठी ट्रान्स सादर

    एचडीएफसी म्युच्युअल फंड तर्फे देशभरातील महिलांमध्ये आर्थिक जागरूकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नारी निवेश यात्रा’चा शुभारंभ

    एचडीएफसी म्युच्युअल फंड तर्फे देशभरातील महिलांमध्ये आर्थिक जागरूकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नारी निवेश यात्रा’चा शुभारंभ

    NEET 2026 मध्ये फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; AIR 55 सह अनेकांनी मिळवले यश

    NEET 2026 मध्ये फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; AIR 55 सह अनेकांनी मिळवले यश

    व्होक्सवॅगन इंडियाचे महाराष्ट्रातील नेटवर्क विस्तारले; छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन डीलरशिपचे उद्घाटन

    व्होक्सवॅगन इंडियाचे महाराष्ट्रातील नेटवर्क विस्तारले; छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन डीलरशिपचे उद्घाटन