मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करूया ; जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या बैठकीतील संकल्प

संकल्प “पी. एम. सूर्यघर योजना” आणि “मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पाणंद/ रस्ते योजना” राबविण्याचे
कोल्हापूर, दि. २३:वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस गुरुवारी दि. २६ वाढदिवस होत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे हा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करूया, असा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्यातील प्रमुखांच्या बैठकीत करण्यात आला.
बैठकीच्या सुरुवातीला गडहिंग्लजचे ज्येष्ठ नेते कै. बाळासाहेब कुपेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाभर तालुकानिहाय ठरवण्यात आलेले विविध सामाजिक उपक्रमांचे नियोजन असे……
राधानगरी- ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप व गुणवंतांचा सत्कार. करवीर- मातोश्री वृद्धाश्रमात फळेवाटप व सांगवडे येथे ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप. भुयेवाडी येथे शालेय साहित्य व फळे वाटप. भुदरगड- गारगोटी येथे शालेय साहित्य वाटप, ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप व वृद्धाश्रमातील वृद्धांना स्नेहभोजन. पन्हाळा- बाल संकुलामध्ये धान्य वाटप, कोडोली आरोग्य केंद्रामध्ये फळेवाटप व पोर्ले येथे फळेवाटप. गगनबावडा- कातळी येथे गरजूंना धान्यवाटप, धुंदवडे येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. हातकणंगले- वडगाव उप जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळेवाटप व आरोग्य शिबिर. भेंडवडे येथे शालेय साहित्याचे वाटप. इचलकरंजीतील आय. जी. एम. रुग्णालयात रुग्णांना फळेवाटप व आई वृद्धाश्रमातील वृद्धांना स्नेहजेवण. दक्षिण कोल्हापूर- गडमुडशिंगी येथील हॅंडीकॅप शाळेच्या मुलांना फळेवाटप. गिरगाव येथील राजर्षि शाहू महाराज वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना फळेवाटप. शिरोळ- ग्रामीण रुग्णालयात फळेवाटप, गरजूंना धान्यवाटप व शालेय साहित्य वाटप. शाहूवाडी- बांबवडे येथे वृक्षारोपण. मलकापूर येथील अनाथ आश्रमात फळेवाटप.
माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील- बापू, केडीसीसी बँकेचे संचालक रणजीतसिंह पाटील, संचालक रणवीरसिंह गायकवाड, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, गोकुळ दूध संघाचे संचालक किसनराव चौगुले, धैर्यशील पाटील- कौलवकर, अमरसिंह माने- पाटील, बाळासाहेब देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र भाटले, माजी जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुनीलराव कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजयसिंह कलिकते, करवीर तालुका अध्यक्ष शिवाजीराव देसाई, संतोष धुमाळ, संभाजी पाटील- भुयेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
संकल्प पी. एम. सूर्यघर योजना आणि मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना राबवण्याचे…….!
या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्राचे वाचन जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे यांनी केले. या पत्रात मंत्री श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे, हा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करा. कुठेही डिजिटल बोर्ड, बॅनर उभा करू नका. या वाढदिवसानिमित्त घरोघरी “पी. एम. सूर्यघर योजना” आणि “मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पाणंद/ रस्ते योजना” राबविण्याचे संकल्प हाती घेणार आहोत.
स्वागत व प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे यांनी केले. आभार शिवाजीराव देसाई यांनी मानले.

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर