आयर्विन ख्रिश्चन मैदानावर कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार प्रथमच ड्रीम वर्क फन फेअर, अवतारची नगरी

कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूरमध्ये प्रथमच ड्रीम वर्क फन फेअर सादर करत आहे अवतार नगरी.दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या ड्रीम वर्क फन फेअर मध्ये मनोरंजनासह धमाल मस्ती वेगवेगळ्या पाळल्यामध्ये लहान मुलांना करायला आणि यात खेळायला मिळणार आहे.
यावर्षी कोल्हापूरकरांना आता एक नवी नगरी घेऊन आले आहेत.
ज्यामध्ये अवतार चित्रपटात साकारण्यात आलेल्या सर्व बाबी उभ्या करण्यात आल्या आहेत.अवतारचा आवाज त्यांचा पक्षी,त्याचे जंगल सर्व येथील अर्विन ख्रिश्चन मैदानावर ही पर्वणी पाहण्यास मिळणार आहे.याचबरोबर कृत्रिम धबधबा ७० हजार लाईट ६० बाय १८० फूट मध्ये ही नगरी वसविण्यात आली आहे. अशी माहिती निजामुद्दीन आणि पवनकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
याठिकाणी लहान मुले ते सर्व वयोगटातील लोक धमाल मस्ती आणि मनोरंजन करणार आहेत.
याठिकांचे आकर्षणाचे केंद्र अवतार शो,दुबई वॉटरफॉल,शॉपिंग स्ट्रीट,चाट भंडार,फूड फेस्ट,मजेदार गेम्स आणि १० पेक्षा जास्त भव्य राईड्स यात जायंट व्हील,ब्रेक डान्स,कोलंबस,सोलोम्बो,ड्रॅगन राईड,किड्स राईड्स,मोठा पाळणा इत्यादींमध्ये आनंदाने राइड करू शकणार आहेत.तर मुलांसाठी जंपिंग, मिनी ट्रेन इत्यादी अनेक मनोरंजक राइड्स आहेत. घरगुती वस्तू, क्रीडा उपकरणे,मुलांसाठी खेळणी आणि तयार कपडे हे सर्व एकाच छताखाली पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाली आहे. याचबरोबर स्वादिष्ट खाद्यपदार्थ, स्नॅक्स, पॉप-कॉर्न, कॉटन कँडी, पाणीपुरी, चाट आदी खाण्यास मिळणार आहे.शिवाय सेल्फीही काढता येणार आहे.सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.तरी कोल्हापूर मध्ये प्रथमच आलेल्या या नगरीस कोल्हापूरकरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
अवतार व जंगलची माहिती
या ठिकाणी उभ्या करण्यात आलेला या नगरी बद्दल विशेष माहिती म्हणजे अवतार ही नगरी अवतार चित्रपटावर आधारित उभी करण्यात आली आहे. हे चित्रपट एकूण पाच आहेत.१८ डिसेंबर (२००९)जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट याची २२ व्या शतकाच्या मध्यात, पँडोरा नावाच्या अल्फा सेंटॉरी स्टार सिस्टीममधील हिरव्यागार चंद्रावर घडते. इथे आर डी ए नावाची कंपनी नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी येते. माणूस जेक सली नावी लोकांचा अवतार वापरून त्यांच्याशी संपर्क साधतो, पण नंतर तोच त्यांच्या बाजूने लढतो.जेम्स कॅमेरूनने याला ५ चित्रपटांची मालिका बनवली आहे.यात पहिला चित्रपट १८ डिसेंबर २००९,दुसरा चित्रपट १६ डिसेंबर २०२२,तिसरा चित्रपट १९ डिसेंबर २०२५,चौथा चित्रपट २१ डिसेंबर २०२९आणि पाचवा चित्रपट १९ डिसेंबर २०३१ असे बनविण्यात आले आहेत याच चित्रपटावर आधारित ही नगरी आयर्नविन ख्रिश्चन मैदानावर उभी करण्यात आली आहे.
कॅमेरूनला लहानपणी पडलेले बायोल्युमिनेसेंट जंगलाचे स्वप्न आणि त्याच्या आईचे ‘उंच निळे लोक’ याबद्दलचे स्वप्न यातून नावी ची कल्पना आली.अवतार हा फक्त चित्रपट नाही, तर पँडोराच्या जगाची, नावी संस्कृतीची आणि माणूस विरुद्ध निसर्ग या संघर्षाची महाकाव्य कथा आहे. यावर या नगरीत थीम अगदी हुबेहूब उभी करण्यात आली आहे.आणि तसाच आवाज यात वापरण्यात आला आहे.लावण्यात आला आहे.

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर