अल्ट्राव्हायोलेटने कोल्हापूरमध्ये नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू करत महाराष्ट्रातील विस्ताराला दिली गती

कोल्हापूर, 27 जुलै 2026 – अल्ट्राव्हायोलेटने आज कोल्हापूरमध्ये आपल्या नवीन यूव्ही स्पेस स्टेशनच्या उद्घाटनाची घोषणा केली असून देशभरातील आपल्या रिटेल आणि सेवा नेटवर्कच्या विस्तारात महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. हा विस्तार कंपनीने अलीकडेच साध्य केलेल्या अनेक महत्त्वाच्या टप्प्यांनंतर करण्यात आला आहे. यामध्ये देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेला ‘किल द पेट्रोल बिल’ हा कार्यक्रम, भारतभरातील टाईप 6 चार्जिंग नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी Bolt.Earth सोबतच्या सहकार्याची घोषणा आणि ‘Battery Flex’ (BaaS) कार्यक्रम यांचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांमधून अल्ट्राव्हायोलेटचा सर्वसमावेशक इलेक्ट्रिक दळणवळण परिसंस्था उभारण्यावरील भर दिसून येतो. या नवीन एक्स्पिरियन्स सेंटरमुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना कंपनीच्या उच्च-कार्यक्षमता असलेल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल्स अधिक सुलभपणे उपलब्ध होतील आणि देशभरातील कंपनीचे वाढते स्थान आणखी मजबूत होईल.
डीलर एम/एस. आहुजा मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या भागीदारीत स्थापन करण्यात आलेले हे नवीन यूव्ही स्पेस स्टेशन ग्राहकांना अल्ट्राव्हायोलेटच्या उच्च-कार्यक्षमता असलेल्या X-47 क्रॉसओव्हर आणि F77s या मोटरसायकलींचा सर्वसमावेशक अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देईल. यूव्ही स्पेस स्टेशन हे 3S सुविधाकेंद्र असून ग्राहकांना टेस्ट राईडपासून विक्री, सेवा, विविध मोटरसायकल अॅक्सेसरीज आणि मर्चेंडाइजपर्यंतचा समृद्ध अनुभव देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. या उत्पादनांमध्ये 40.2 hp क्षमतेचे पॉवरट्रेन आणि 100 Nm टॉर्क असून, ती केवळ 2.8 सेकंदांत 0 ते 60 kph वेग गाठू शकतात. 10.3 kWh क्षमतेच्या बॅटरीने सुसज्ज असलेल्या या मोटरसायकली एका चार्जमध्ये 323 किमी इतकी IDC रेंज देतात.
या उद्घाटनाबाबत बोलताना अल्ट्राव्हायोलेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक नारायण सुब्रमण्यम म्हणाले, “कोल्हापूरची ओळख नेहमीच अभियांत्रिकीतील उत्कृष्टता, उत्पादन क्षमता आणि समृद्ध ऑटोमोटिव्ह संस्कृतीशी जोडलेली राहिली आहे. भारतातील महत्त्वाच्या ऑटो कॉम्पोनंट (वाहनांसाठी लागणारे घटक) उत्पादन केंद्रांपैकी एक असलेले हे शहर नाविन्यपूर्णतेचा आग्रह धरते. अल्ट्राव्हायोलेटच्या तत्त्वज्ञानाशी हे अत्यंत सुसंगत आहे. आमच्या नवीन यूव्ही स्पेस स्टेशनच्या उद्घाटनाद्वारे आम्ही कोल्हापूरमध्ये अल्ट्राव्हायोलेटचा संपूर्ण स्वतःच्या मालकीची गाडी असण्याचा हक्काचा अनुभव घेऊन येत आहोत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च-कार्यक्षमता असलेल्या मोटरसायकलींची श्रेणी आणि सर्वसमावेशक विक्रीपश्चात सेवा सहाय्य हे सर्व एका ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. कोल्हापूरच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्राचा भाग बनण्यास आणि येथील मोटरसायकलप्रेमींचे अल्ट्राव्हायोलेट परिवारात स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
प्रगत इलेक्ट्रिक दळणवळण सुविधा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या अल्ट्राव्हायोलेटच्या बांधिलकीनुसार, कंपनीने अलीकडेच ‘किल द पेट्रोल बिल’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत, अल्ट्राव्हायोलेट F77 किंवा X-47 खरेदीसाठी अपग्रेड करणाऱ्या कोणत्याही ग्राहकाला त्यांच्या मागील दुचाकीवर गेल्या 2 वर्षांत केलेल्या किलोमीटर प्रवासाच्या समतुल्य कॅशबॅक मिळेल. या योजनेअंतर्गत, ग्राहक त्यांच्या रायडिंग इतिहास आणि वाहनाच्या वापराच्या आधारे अल्ट्राव्हायोलेट मोटरसायकल खरेदीवर 30,000 रु. पर्यंतचे लाभ मिळवू शकतात. आधीपासूनच पेट्रोलवर केलेल्या प्रवासातील किलोमीटरचे रूपांतर मालकी हक्काशी संबंधित लाभांमध्ये करून अल्ट्राव्हायोलेट इलेक्ट्रिक मोबिलिटीचा एक अत्यंत महत्त्वाचा फायदा अधोरेखित करत आहे. म्हणजेच कार्यक्षमता, तंत्रज्ञान, विश्वासार्हता किंवा रायडिंग अनुभवाशी कोणतीही तडजोड न करता इंधनावरील वारंवार होणाऱ्या खर्चापासून मिळणारे स्वातंत्र्य ते अनुभवायला देत आहेत.
महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील यूव्ही स्पेस स्टेशनचा पत्ता: CTS. No. 453, B/6, द फर्न हॉटेल शेजारी, स्टेशन रोड, श्री शाहू मार्केट यार्डसमोर, कोल्हापूर, महाराष्ट्र 416005

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर