आयसीआयसीआय प्रु आयप्रोटेक्ट स्मार्ट प्लस: कमी प्रीमियममध्ये 10 वर्षांचे लाइफ कव्हर मिळवून छोट्या कालावधीच्या आर्थिक जबाबदाऱ्या सुरक्षित करण्याचा स्मार्ट मार्ग

मुंबई, 30 जुलै 2026: आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल आयप्रोटेक्ट स्मार्ट प्लस आता 10 वर्षांच्या लाइफ कव्हर पर्यायासह उपलब्ध आहे. ही योजना अशा ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांच्यावर गृहकर्ज, मुलांचे शिक्षण आणि व्यावसायिक कर्जे अशा जबाबदाऱ्या आहेत. यामुळे, ज्या काळात आर्थिक जबाबदाऱ्या सर्वाधिक असतात, त्या काळात ग्राहकांना कमी प्रीमियममध्ये चांगले लाइफ कव्हर निवडणे या योजनेमुळे शक्य होते.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्सचे वितरण प्रमुख, श्री. भरत गुंटी म्हणाले, “जीवनातील ध्येयांनुसार ग्राहकांच्या आर्थिक संरक्षणाबद्दलच्या अपेक्षा सातत्याने बदलत आहेत. आर्थिक प्रवासाच्या विविध टप्प्यांवर ग्राहकांसाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींचे रक्षण करण्यास मदत करणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आयसीआयसीआय प्रु आयप्रोटेक्ट स्मार्ट प्लस हा आमचा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन दर्शवतो. यात 10 वर्षांची मुदत पॉलिसी असून, किफायतशीरपणा आणि महत्त्वपूर्ण आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी तयार केलेली वैशिष्ट्ये यांचा मेळ साधला जातो.
ग्राहकांना असाध्य आजाराचे निदान झाल्यास आयसीआयसीआय प्रु आयप्रोटेक्ट स्मार्ट प्लस अंतर्गत विम्याच्या रकमेइतकेच 100% संरक्षण मिळते. विशेष म्हणजे, या योजनेत गंभीर आजारांपासून संरक्षणाचा पर्याय उपलब्ध आहे, ज्यासाठी ठरावीक रकमेचा प्रीमियम आकारला जातो आणि त्यात दरवर्षी वाढ होत नाही. या योजनेत 67,100 रुपयांपर्यंतच्या मोफत आरोग्य सेवांचाही समावेश आहे, तसेच 3 लाख रुपयांपर्यंतची क्लेमची रक्कम ग्राहकांना त्वरित दिली जाते.
या व्यवसायातील 99.3%च्या यशस्वी क्लेम सेटलमेंट रेशोसह आणि Q1-FY2027 मध्ये सरासरी 1 दिवसाच्या क्लेम सेटलमेंट टर्नअराउंड वेळेसह, ग्राहकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जेव्हा आमची सर्वाधिक गरज असते, तेव्हा आम्ही नेहमी त्यांच्यासोबत असतो.
आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीत (Q1-FY2027), कंपनीने 1,306 कोटी रुपयांचे मृत्यू-विषयक दावे निकाली काढले आणि मॅच्युरिटी व सर्व्हायव्हल बेनिफिट्स (मुदतपूर्ती व अन्य लाभ) म्हणून 3,360 कोटी रुपयांची रक्कम अदा केली; यावरून पॉलिसीधारकांना वेळेवर आर्थिक संरक्षण आणि मानसिक स्वास्थ्य प्रदान करण्यावर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफचा निरंतर भर दिसून येतो. याव्यतिरिक्त, आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनीने 5,149 कोटी रुपयांचे मृत्यू-विषयक दावे निकाली काढले आणि मॅच्युरिटी तसेच सर्व्हायव्हल बेनिफिट्स अंतर्गत 15,363 कोटी रुपयांची रक्कम देऊ केली.”

  • Related Posts

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एच१ एन१ (स्वाईन फ्लू) आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ क्लेम्स ऑफिसर…

    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    कोल्हापूर : एआय+ स्मार्टफोनने ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ ही नवीन आवृत्ती सादर केली असून, यात डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि वापरकर्त्यांचे नियंत्रण अधिक मजबूत करण्यात आले आहे. नव्या आवृत्तीत ‘नेक्स्ट प्रायव्हसी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
    एआय+चा ‘नेक्स्ट क्वांटम ओएस १.१’ सादर

    ‘अडकित्ता’ या मराठी झी5च्या नव्या चित्रपटातून पालकत्व, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा वेध; सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचा प्रीमियर ११ सप्टेंबर २०२६ रोजी

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    सतत सक्रीनकडे पाहिल्याने मान दुखते आणि डूमस्क्रोलिंग गमुळे थकवा येतो ; Gen Z च्या सर्व ‘वेदनां’साठी झंडु बामने आणले आहे एक नवीन समाधान

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचे 25 स्टोर्स पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी त्यांच्या जुन्या सोन्याला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर

    एस्कॉर्ट्स कुबोटाचे 8 वर्षांच्या हस्तांतरणीय वॉरंटीसह नवीन ट्रॅक्टर