लोटस इलेट्रेचा कोल्हापुरात खास ब्रँड अनुभव; २६ व २७ सप्टेंबरला विशेष कार्यक्रम

कोल्हापूर, : लोटस कार्स इंडियाच्या ‘ग्राहक संपर्क आणि ब्रँड एक्सपिरियन्स’ अभियानांतर्गत पुरस्कारविजेती इलेक्ट्रिक परफॉर्मन्स कार ‘लोटस इलेट्रे’ कोल्हापुरातील ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी संभाव्य ग्राहक, उद्योजक, व्यावसायिक नेते, लक्झरी जीवनशैलीप्रेमी आणि वाहनप्रेमींसाठी विशेष ब्रँड अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पश्चिम भारतातील बहुशहरी दौऱ्याचा हा महत्त्वाचा टप्पा असून, पुणे आणि साताऱ्यानंतर लोटसचा हा दौरा कोल्हापुरात दाखल झाला आहे. त्यानंतर हा दौरा गोव्याकडे मार्गक्रमण करणार आहे. यासोबतच दक्षिण आणि पूर्व भारतातील विविध शहरांमध्येही ब्रँडचा ग्राहक संपर्क उपक्रम सुरू आहे.
कोल्हापुरातील कार्यक्रमात लोटस इलेट्रे या ऑल-इलेक्ट्रिक हायपर-एसयूव्हीवर विशेष भर दिला जाणार आहे. उत्कृष्ट परफॉर्मन्स, प्रगत तंत्रज्ञान आणि दैनंदिन वापरातील उपयुक्तता यांचा मेळ साधणारी ही इलेक्ट्रिक एसयूव्ही लोटसच्या नव्या पर्वाचे प्रतिनिधित्व करते.
या विशेष कार्यक्रमात आमंत्रित पाहुण्यांना ड्राइव्ह एक्सपिरियन्स, वाहनाचे वैयक्तिक सादरीकरण आणि ब्रँडविषयी सविस्तर माहिती मिळणार आहे. या उपक्रमातून कोल्हापुरातील संभाव्य ग्राहकांशी थेट संवाद साधण्यासह ब्रिटिश परफॉर्मन्सचा वारसा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अनुभव देण्याचा लोटसचा प्रयत्न आहे.

  • Related Posts

    AI+ नोव्हा लॅपटॅब; टॅबलेटसह लॅपटॉपसारख्या कामासाठीही सक्षम

    कोल्हापूर : AI+ ने उत्पादकता आणि मनोरंजनाचा अनुभव लक्षात घेऊन Nova LapTab सादर केला आहे. जोडता येणाऱ्या फिजिकल कीबोर्डमुळे हे डिव्हाइस स्ट्रीमिंग, नोट्स काढणे, अभ्यास तसेच लॅपटॉपसारख्या कामांसाठी वापरता येते.…

    डॉटर्स डे निमित्त क्लिनिक प्लसची नवी चित्रफीत; ‘मुलगी असते आईची मजबुती’

    कोल्हापूर, : डॉटर्स डेच्या निमित्ताने क्लिनिक प्लसने आई-मुलीच्या नात्यातील परस्पर बळ अधोरेखित करणारी नवी चित्रफीत सादर केली आहे. ‘मुलगी असते आईची मजबुती’ हा या मोहिमेचा मुख्य विचार आहे. चित्रफितीत मुलगी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    AI+ नोव्हा लॅपटॅब; टॅबलेटसह लॅपटॉपसारख्या कामासाठीही सक्षम
    डॉटर्स डे निमित्त क्लिनिक प्लसची नवी चित्रफीत; ‘मुलगी असते आईची मजबुती’

    लोटस इलेट्रेचा कोल्हापुरात खास ब्रँड अनुभव; २६ व २७ सप्टेंबरला विशेष कार्यक्रम

    लोटस इलेट्रेचा कोल्हापुरात खास ब्रँड अनुभव; २६ व २७ सप्टेंबरला विशेष कार्यक्रम

    रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन

    रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन
    एआय+ नोव्हा 2 पॉवर 5G स्मार्टफोन लाँच; आकर्षक डिझाइनसह दमदार बॅटरीचा संगम

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

    एच१ एन१ आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचे महाराष्ट्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन