कोल्हापूर /प्रतिनिधी
भारताची फाळणी झाल्यावर तत्कालीन भारत शासनाच्या भूमिकेमुळे भारत हे हिंदु राष्ट्र म्हणून घोषित न होता केवळ मतांचा विचार करून आणि सत्ता कह्यात घेण्याच्या हेतूने हिंदू समाजाचा कोणताही विचार न करता ‘कोणताही निर्णय न घेण्याची’ स्वार्थी भूमिका घेण्यात आली. त्यानंतर वर्ष १९७६ च्या घटना दुरुस्तीत ‘सेक्युलर’ हा शब्द घुसडण्यात आला. त्यामुळे ७२ वर्षांपेक्षा अधिक काळ भारतात हिंदू, जैन, बुद्ध, शीख, पारशी या समुदायाला शरणार्थी असल्यासारखे वागवले जात होते. धर्माच्या आधारावर बहुसंख्य समाजावर इतका काळ अन्याय होण्याचे हे जगातील पहिलेच उदाहरण आहे. हिंदू समाजावर अशा पद्धतीने अन्याय झाल्यास त्यांच्यासाठी अन्य कोणताही देश पृथ्वीतलावर अस्तित्वात नव्हता. नागरिकत्व विधेयकामुळे हिंदू, जैन, बौद्ध, शीख, पारशी या समुदायाला भारतात शरणार्थी म्हणून नाही, तर थेट भारतीय नागरिकत्व मिळणार आहे.असे मत विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता रणजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
अधिवक्ता रणजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, ‘‘विश्वातील हिंदूंच्या हितासाठी वर्ष १९६४ पासून विश्वभर कार्यरत असलेल्या विश्व हिंदु परिषदेच्या कार्यास यामुळे १० सहस्र हत्तींचे बळ मिळणार आहे. ही किमया करणार्या आणि १३० कोटी भारतीय नागरिकांचे प्रतिनिधीत्व करणार्या पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन. समाजाच्या या भावना केंद्र शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकार्यांना पत्रही देण्यात आले.’’ या वेळी कार्याध्यक्ष श्री. प्रसाद मुजुमदार, श्री. राजेंद्र मकोटे, सुनेत्रादेवी घाटगे, अपर्णा वाघमारे, तुषार भिवटे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.