जगभर सर्वोत्तम काम करणाऱ्या कंपन्यांसाठी सर्वोच्च आरोग्य व सुरक्षा व्यवस्थापन सन्मान
कोल्हापूर – माइंडस्पेस बिझनेस पार्क्सयाके. रहेजा कॉर्पचा कमर्शिअल बिझनेस असणाऱ्या व भारतात प्रमुख ठिकाणी ग्रेड ए ऑफिस स्पेस उपलब्ध करणाऱ्या कंपनीच्यामांइडस्पेस ऐरोली पूर्व (मुंबई महानगर प्रदेश),माइंडस्पेस मधापूर (हैदराबाद) व कॉमरझोन येरवडा (पुणे)या 3 बिझनेस पार्कना लंडनमधील मर्चंट टेलर्स हॉल येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमातब्रिटीश सेफ्टी कौन्सिलकडून स्वॉर्ड ऑफ ऑनर या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
स्वॉर्ड ऑफ ऑनरसाठी स्पर्धा करण्यासाठी, कंपनीने सर्वप्रथम ब्रिटीश सेफ्टी कौन्सिलच्या हेल्थ व सेफ्टी ऑडिटमधये ‘फाइव्ह स्टार्स’ (92% वा अधिक स्कोअर) हे सर्वोच्च रेटिंग मिळवणे गरजेचे आहे.ऑडिटदरम्यान, व्यवसायाच्या निरनिराळ्या पैलूंमध्ये उत्कृष्ट आरोग्य व सुरक्षा व्यवस्थापन करत असल्याचे ऑडिटरना दाखवावे लागेल. ऑडिटमध्ये प्रत्यक्ष ठिकाणी कार्याचा नमुने आणि रिअल टाइम प्रतिक्रिया मिळम्यासाठी कर्मचारी व भागधारक यांच्या मुलाखती यांचा समावेश आहे.बिझनेस पार्कमधील व्यावसायिक आरोग्य व सुरक्षा यावर सर्वाधिक भर होता, मात्र सर्वोत्तम पद्धती साध्य करण्याच्या दृषटीने सुधारणा करण्यासाठीही मार्गदर्शन करण्यात आले.
ब्रिटीश सेफ्टी कौन्सिल फाइव्ह स्टार ऑडिटमधये फाइव्ह स्टार मिळालेल्या जगभरातील कंपन्यांना स्वॉर्ड ऑफ ऑनरपुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. या वर्षी विजेत्या ठरलेल्या कंपन्या यूके, युरोप, भारत व मध्य पूर्व येथील बांधकाम, शिक्षण व प्रशिक्षण, ऊर्जानिर्मिती, फूड व ड्रिंक, लिजर, लॉजिस्टिक्स, उत्पादन, रिटेल व वाहतूक अशा वैविध्यपूर्ण उद्योगांतील होत्या.
स्वॉर्ड ऑफ ऑनरपुरस्कार जिंकल्याबद्दल बोलताना, कमर्शिअल रिअल इस्टेट व माइंडस्पेस बिझनेस पार्क्स आरईआयटी यांचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद रोहिरा यांनी सांगितले,“माइंडस्पेस बिझनेस पार्क्समध्ये आम्ही उत्तम प्रशासन, उत्तरदायित्व, जबाबदारी व पारदर्शकता या मूल्यांचे पालन करतो व त्यामुळे आमचे वेगळेपण अधोरेखित होते.स्वॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कार हे आमच्या चोखंदळ ग्राहकांना आरोग्य व सुरक्षा यासंबंधीचे सर्व घटक समाविष्ट असणाऱ्या ग्रेड ए वर्कप्लेस उपलब्ध करण्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांचे प्रतिक आहे.”
रोहिरा यांनी नमूद केले, “आम्ही ‘सेफ्टी इज गुड बिझनेस’ या विचारसरणीची सांगड आमच्या कार्याशी घालून या विचारसरणीचे पालन करतो.भारतातील उदयोन्मुख मनुष्यबळासाठी जागतिक दर्जाच्या वर्कप्लेस उपलब्ध करण्यासाठी यापुढेही प्रयत्न करण्याच्या दृष्टीने आमच्या टीमला या पुरस्कारामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.”