कोल्हापूर शहरात अलिकडच्या काळात वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालायं. त्याला काही अंशी शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणारी शासकीय कार्यालये जबाबदार असल्याच समोर येत आहे. तर कसबा बावडा रोडवर असणाऱ्या सुसज्ज मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा अंदाजे ६० टक्के भाग वापराविना पडून आहे. त्यामुळं शहरात वाहतूक कोंडीस जबाबदार ठरत असलेली शासकीय कार्यालये कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तर उर्वरित कार्यालये अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावीत.आणि कोल्हापूर वाहतूक कोंडीतून मुक्त करावं अशी प्रमुख मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीनं करण्यात आलीयं.याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना शिष्टमंडळातर्फे देण्यात आलयं. कोल्हापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी गेल्या काही दिवसापासून वाहतूक कोंडीचा तसेच गाड्या पार्किंग चा मोठा प्रश्न निर्माण झालायं. अनेक ठिकाणी पार्किंग सुविधा नसल्यानं वाहनधारक आपलं वाहन मुख्य रस्त्यावरच पार्क करत आहेत.त्यामुळं वेळेचा अपव्यय, ध्वनी, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याला काही अंशी शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणारी शासकीय कार्यालये ही जबाबदार ठरत असल्याचं समोर आलायं. यामध्ये करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिर परिसरात विद्यापीठ हायस्कूल समोर जुन्या इमारतीमध्ये करवीर प्रांत कार्यालयाचा काही कार्यभार अजूनही. चालतो,जिल्हा होमगार्ड आॅफीस,रजिस्टर आॅफीस, सार्वजनिक बांधकाम ,जुना राजवडा पोलिस स्टेशन विभागाची काही कार्यालयं इथं असल्यानं आई अंबाबाई मंदिर परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. प्रांत कार्यालय मुख्य कार्यालयात नवीन इमारतीत जाणे गरजेचं आहे, जिल्हा होमगार्ड कार्यालय कसबा बावडा रोडवर असणाऱ्या मुख्य होमगार्ड कार्यालयाच्या इमारतीत स्थलांतरित व्हावे, रजिस्टर आॅफीस महापालिकेच्या गांधी मैदान नजीकच्या मोठ्या नवीन इमारतीत तर राजवाडा पोलिस स्टेशन गांधी इमारत किंवा शाहू बँकेच्या मागे ताराराणी शाळेच्या जून्या इमारतीत स्थलांतरित करण्यात यावेत.या प्रमुख मागण्यासह शहरातील अन्य ठिकाणी वाहतूकीस कोंडी ठरणारी शासकीय कार्यालये अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तर याबाबत जिल्हा प्रशासनं, शासकीय कार्यालये, महापालिका प्रशासन, नागरी कृती समितीच्या बैठका आयोजित करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली.दरम्यान लवकरच वाहतूक कोंडीबद्दल बैठका घेतल्या जातील.आणि वाहतूक कोंडी चा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असं आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शिष्टमंडळाला दिलं.यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे, संभाजीराव जगदाळे, गणी आजरेकर ,राहूल ढवळे,अशोक रामचंदाणी,राजवर्धन यादव, चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या सह कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.