कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूरात छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अँन्ड रिसर्च(सायबर)संस्था आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीनं सायबर राधाबाई शिंदे मेमोरियल सभागृहात दिं.१०जानेवारी रोजी पर्यावरण विभागातर्फे शास्वत विकासावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलयं. दरम्यान शास्वत विकासाची उद्दिष्ट च्या अनुषंगाने या परिषदेत विषयांची मांडणी केली जाणार आहे. अशी माहिती पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. एस.डी.कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अँन्ड रिसर्च(सायबर) संस्था व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण देणारी कोल्हापूरातील सर्वात जुनी संस्था असून संस्थेला NAAC चे A + नामांकन प्राप्त झाले आहे.तर संस्थेमध्ये व्यवसाय व्यवस्थापन, संगणक शास्र,पर्यावरण व्यवस्थापन, समाजकार्य आणि अर्थशास्त्र असे पाच विभाग असून पर्यावरण व्यवस्थापन हा विभाग १९८७साली सुरू झालायं. तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ १९७०.पासून प्रदूषण नियंत्रणाच्या कामात कार्यरत असून विविध पर्यावरण घटकांचे प्रदूषण रोखणे, कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे तसेच समाजामध्ये पर्यावरण संदर्भात जनजागृती करणे अशी कामे नियंत्रण मंडळाकंडून होत आहेत. दरम्यान यावर्षी दिं.१० जानेवारी रोजी सायबरच्या पर्यावरण विभागातर्फे शास्वत विकासावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचं विभागप्रमुख डॉ. एस.डी.कदम यांनी सांगितलं. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई मेम्बर सेक्रेटरी इ.रवींद्रन ,महापालिका आयुक्त मल्लिनाथ कल्लशेटी असणार आहे. तर एशियन डेव्हलपमेंट बँक सभासद डॉ. अजय देशपांडे,माजी कुलगुरू साबरगुमामा विद्यापीठ श्रीलंका डॉ. रोहाना ,ग्लोबल कन्सल्टंट ठाणे उल्हास परळीकर,डायरेक्टर वाॅटर एमपीसीबी मुंबई वाय.बी.सोनटक्के, रिजनल आॅफीसर मुंबई नंदकुमार गुरव,विलिंगडन काॅलेज सांगली डॉ. राजेंद्र पोंडे यांची व्याख्याने होणार आहेत. त्याचबरोबर उद्योजक, संशोधक आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलयं.दरम्यान या परिषदेमध्ये विविध विषयावरील तज्ञ पर्यावरण, अर्थकारण, जैव-विविधता अशा विषयांवर मांडणी करणार असून विविध विद्यापीठातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधक यामध्ये शोध निबंध सादर होणार आहेत. तर या परिषदेला कोल्हापूर, पुणे, मुंबई. आणि कोकण भागातील औद्योगिक वसाहतीतील उद्योजक सहभागी होणार असून ते प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील अनुभव कथन करणार आहेत. तरी या आंतरराष्ट्रीय परिषदेचा लाभ सर्वांनी घेण्याच आवाहन यावेळी एस.डी.कदम यांनी केलयं.
पत्रकार परिषदेला रिजनल आॅफीसर रवींद्र आंधळे, प्रा.डॉ. दीपक भोसले, सहाय्यक प्राध्यापिका रसिया पडळकर उपस्थित होत्या.