जानेवारी : रॉयल एनफिल्ड या मध्यम आकारमानाच्या मोटरसायकल विभागातील जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपनीने नवीन भारत स्टेज VI ची पूर्तता करणाऱ्या रॉयल एनफिल्ड क्लासिक 350ची घोषणा केली आहे. कंपनीच्या युनिट कन्स्ट्रक्शन इंजिन (यूसीई) प्लॅटफॉर्मखाली तयार झालेली ही नवीन उत्सर्जन नियमांचे पूर्तता करणारी पहिली मोटरसायकल आहे. नवीन क्लासिक 350 ड्युअल चॅनल एबीएस प्रकारची मोटरसायकल स्टेल्थ ब्लॅक व क्रोम ब्लॅक या दोन नवीन कलरवेजमध्ये आणली जाणार आहे. याशिवाय सिग्नल्स एअरबोर्न ब्ल्यू, सिग्नल्स स्टॉर्मरायडर सॅण्ड, गनमेटल ग्रे आणि क्लासिक ब्लॅक हे रंग यांत आहेत. आजपासून ही मोटरसायकल भारतातील सर्व डीलरशिप्समध्ये उपलब्ध होईल. तिची किंमत (एक्स-शोरूम) १,६५,०२५ रुपये आहे.
नवीन नियामक उत्सर्जन नियमांमध्ये संक्रमित होणारी क्लासिक 350 ड्युअल एबीएस ही पहिली मोटरसायकल आहे. या पोर्टफोलिओमधील अन्य मोटरसायकल्सही ३१ मार्च २०२०पर्यंत बीएस VIची पूर्तता करणाऱ्या श्रेणीत आणल्या जाणार आहेत.
रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 आता इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टमने (ईएफआय) सुसज्ज असेल. यामुळे मोटरसायकलचे परिष्करण, चालवण्याची क्षमता (ड्रायव्हिबिलिटी) आणि सातत्यपूर्ण कोल्ड स्टार्टअॅबिलिटी सुधारण्यात मदत होईल तसेच कोणत्याच परिस्थितीत चढउतार न होता शक्तीची निर्मितीही सुरळीत होईल. बीएस VI उत्सर्जन नियमांची पूर्तता करतानाच संपूर्ण ऑपरेटिंग कक्षेत वाहनाची कामगिरी सुधारावी तसेच श्रेष्ठ दर्जाचा रायडिंग अनुभव मिळावा अशा पद्धतीने एकंदर इंजिनची शक्ती आणि टॉर्क डिलिव्हरी अनुकूलित करण्यात आली आहे. स्टेल्थ ब्लॅक आणि गनमेटल ग्रे कलरवेजमधील क्लासिक 350 मिश्रधातूच्या (अलॉय) चाकांनी व ट्युबललेस टायर्सनी सुसज्ज असेल. या मोटरसायकल्सवर तीन वर्षांची वॉरंटी तसेच तीन वर्षांचा रोडसाइड असिस्टन्स या सुविधा दिल्या जाणार आहेत. म्हणजेच या सुविधांचा कालावधी एक वर्षाने वाढवण्यात आला आहे.
रॉयल एनफिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनोद दासारी नवीन बीएस VIची पूर्तता करणाऱ्या मोटरसायकलच्या लाँचबद्दल म्हणाले, ”काळापुढील विचार करणे आणि दीर्घकालीन धोरणांचा अवलंब करणे यांतूनच शाश्वत वाढ साध्य होते यावर रॉयल एनफिल्डचा विश्वास आहे. बीएस VI उत्सर्जन नियमाचे पालन करण्यासाठी सरकारने दिलेले निर्देश हे स्वागतार्ह पाऊल आहे. वाहतुकीच्या भविष्यकाळाच्या दिशेने टाकलेल्या पहिल्या पावलांपैकी हे एक आहे. यामुळे केवळ पर्यावरणपूरक तंत्रज्ञान व शाश्वत वाहतुकीचीच हमी मिळणार नाही, तर भारतीय वाहन उद्योग जगातील अन्य वाहन उद्योगांच्या तुलनेत सरस ठरणार आहे. नवीन श्रेणीमध्ये बीएस VIची पूर्तता दिलेल्या वेळेच्या पूर्वीच होईल याची काळजी आम्ही घेतली आहे. जेणेकरून आमच्या सध्याच्या व संभाव्य ग्राहकांना उत्पादनाचा अखंडित अनुभव घेता येईल. यामुळे ग्राहकांचा ब्रॅण्डवरील विश्वास वाढेल आणि शुद्ध मोटरसायकलिंगच्या विश्वात अधिकाधिक लोक प्रवेश करतील असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.”
२००८ मध्ये बाजारात आलेली रॉयल एनफिल्ड क्लासिक ही दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडातील ब्रिटिश मोटरसायकल्सच्या रेट्रो लुकवरून प्रेरित आहे. १९५०च्या दशकातील वैशिष्ट्यपूर्ण ब्रिटिश शैली क्लासिकमध्ये कायम राखण्यात आली आहे; साधी, सुसंगत, प्रमाणबद्ध व सफाईदार अशी ही मोटरसायकल आहे. या मोटरसायकलला ३४६सीसी इंजिनची शक्ती आहे. फ्रण्ट आणि रीअर मडगार्डस्, हेडलाइट केसिंग, इंधन टाकी, ओव्हल हत्यारांची पेटी, एग्झॉस्ट फिन्स, स्पीडोमीटर डायल्स, टेल लाइट असेम्ब्ली आणि हेडलॅम्प कॅप हे सर्व काही दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील ब्रिटिश मोटरसायकल्सच्या प्रतिमेबरहुकूम ठेवण्यात आले आहे.