कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने गेल्या पावसाळ्यात 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत 23 लाख 8 हजार रोपांची लागवड केली होती.यापैकी ऑक्टोंबर 2019 अखेर जिवंतरोपांची सरासरी टक्केवारी 85 टक्के इतकी असून लागवड केलेल्या रोपांची वाढ 3 ते 6 फुटापर्यंत असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सन 2019 च्या पावसाळ्यामध्ये 33 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत जिल्ह्यास 22 लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र या विभागाने 23.08 लाख रोपांची 31 जुलै 2019 अखेर लागवड केली. ऑक्टोबर 2019 अखेर जीवंत रोपांची सरासरी टक्केवारी 85 टक्के इतकी असून लागवड केलेल्या रोपांची वाढ 3 ते 6 फुटापर्यंत झालेली आहे.