कोल्हापूर /प्रतिनिधी
करवीर निवासिनी आई महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंड या जागेचा ताबा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे रितसर देण्यात आला.
आई महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंड जागेचा ताबा तत्कालीन कलेक्टर यांच्या आदेशानुसार नगरपालिकेकडे सार्वजनिक उध्यान करण्यासाठी देण्यात आला होता .दरम्यान याकाळात त्या जागेवर शौचालय बांधण्यात आले होते .त्यामुळे हिंदूत्ववादी संघटनांनी आंदोलन करून शौचालय बंद पाडले होते .दरम्यान यावर विधानसभेत तारांकित प्रश्न हि विचारण्यात आले होते.तर गेले वर्षभर देवस्थान समितीच्या वतीने ताबा मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरु होता. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांच्या अथक पाठपुरावा व महापालिकेच्या पदाधिकारी यांच्या सकारात्मक सहकार्याने आज मणिकर्णिका कुंड या जागेचा कागदोपत्री रितसर ताबा देवस्थान समितीकडे देण्यात आला.
यावेळी इस्टेट आँफिसर बरालेसाहेब, इस्टेट सर्व्हेअर सुनील ठोंबरे आणि इस्टेट विभागाचे शेखर साळोखे, नितीन चौगले, घाडगे,तसेच देवस्थान समिती सदस्य राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, उपसचिव साळवी, इंजिनिअर देशपांडे, व्यवस्थापक धनाजी जाधव आणि कर्मचारी उपस्थित होते.