कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळया निमित्त महानगरपालिकेच्या शाळेतील व खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि.16 जानेवारी करण्यात आले. महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने हा कार्यक्रम केशवराव भोसले नाटयगृह येथे आयोजीत करण्यात आला होता. या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ महापौर ऍ़ड.सौ.सुरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते शाहु महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन व दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, प्राथमिक शिक्षण समिती उप सभापती सचिन पाटील, विरोधी पक्षनेते विजय सुर्यवंशी, नगरसेवक अशोक जाधव, प्रतापसिंह जाधव, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, नगरसचिव दिवाकर कारंडे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक आदी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी सर्वाचे रोप देऊन स्वागत केले.
यावेळी महापौर ऍ़ड.सौ.सुरमंजिरी लाटकर यांनी बोलतांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळया निमित्त दि.16 ते 19 जानेवारी 2020 याकालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध तालीम संस्था, बोर्डिंग्ज, शाहू प्रेमी यांच्यासह समस्त कोल्हापूरकर सहभागी होत आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनीे शिक्षणाला प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी कायदा केला कोणीही शिक्षणापासुन वंचीत राहू नये अशी काळजी त्यांनी घेतली. अशी दुरदृष्टी असलेल्या शाहू महाराजाच्या नगरीमध्ये शाळेच्या मुला/मुलींच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने शाहू स्मारक लोकापर्ण सोहळयाला सुरवात होत आहे ही खरच आनंदाची गोष्ट आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजानी तळागाळातील, उपेक्षीत लोकासांठी काम केल आहे. त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. याठिकाणी महानगरपालिकेच्या व खाजगी शाळेतील मुलांना आपली कला सादर करुन राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा जागर केला आहे.
प्रस्ताविकात प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी बोलतांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक लोकार्पण सोहळा कार्यक्रमाची सुरवात केशवराव भोसले नाटयगृहातून होत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कला, शिक्षण, संगीत, क्रिडा क्षेत्रामध्ये दुरदृष्टी असणारे लोकराजे होते. त्यांनी सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन काम केले असल्याचे सागितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप मगदूम व शितल हिरेमठ यांनी केले
यावेळी या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात दत्तबाळ इंग्लिश मेडियम यांनी सरस्वती वंदना करुन केली. यासह भाई माधवराव बागल प्रशाला कसबा बावडा शाळा यांनी पहिले नमन या गीतावर आली कला सादर केली. सेन्ट ऍ़न्थोनी स्कूल यांनी शुभ दिन आयोरे, जीवन कल्याण प्राथमिक विद्यालयाने पाणी हरवले (भारुड), एम.एस.पटेल स्कूलने शाहू राजे थोर होते या शिर्षकाखाली विविध रुपातील पोषाक परिधार करुन गीतही सादर केले. डॉ.दिपक साळुंखे प्राथमिक विद्यालयाने दार उघड ग बाई दार उघड, गणेश विद्यालयाने ए वतन ए वतन, नुतन मराठी विद्यालयोन जोगवा गीत, दत्ताबाळ प्राथमिक विद्यालयाने रणी फडकतो, माझी शाळा भोसलेवाडी यांनी लवाटी भंडारा, म.ल.ग. प्राथमिक शाळेने रंग दे बसंती, महापालिका बॅ.बाळासोा खर्डेकर विद्यामंदिर यांनी मराठमोळ गाणी, आण्णासोा शिंदे विद्यामंदिरने लख्ख पडला प्रकाश या गीतातून कला सादर केली. चाटे स्कूल संभाजीनगर यांनी से नो टु प्लॅस्टिक, महापालिका नेहरुनगर विद्यामंदिर यांनी इडा पिडा टळो या देखाव्यातून जनजागृती केली. पिन्स शिवाजी ताराराणी शाळेने शिवशाही हा देखावा सादर केला. दत्ताबाळ हायस्कूल (माध्यमिक) यांनी जोगवा गीतावर नृत्य सादर केले. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल यांनी लेझीम या पारंपारीक कलेचे सादरीकरण केले. कोल्हापूर पब्लिक स्कूल यांनी सेव्ह वॉटर द्वारे पाणी बचतीचा नारा दिला.
यावेळी या सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्या पहिल्या चार संघांना महापौर ऍ़ड.सौ.सुरमंजिरी लाटकर यांनी रोख रक्कम जाहिर केली. प्रथम विजेत्या शाळेस रक्कम रु.5000/-, द्वितीय विजेल्या शाळेस रक्कम रु.3000/- व तृतीय आणि चौथा क्रमांक विजेल्या शाळेस रक्कम रु.1500/- व सन्मानचिन्ह घोषित करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक महानगरपालिकेच्या नेहरुनगर विद्यामंदिर यांनी पटकाविला तर द्वितीय क्रमांक प्रिन्स शिवाजी ताराराणी विद्यालय. तसेच तृतीय क्रमांक जिवन कल्याण प्राथमिक विद्यालय व चौथ्या क्रमांक दत्ताबाळ हायस्कुल यांना पटकाविला. यावेळी निरिक्षक म्हणून विजय लंबे, आर.जी.कांबळे, अरविंद कोळी, प्रभाकर लोखंडे यांनी काम पाहिले.
यावेळी लेखापाल बाबा साळोखे, शैक्षिणीक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, सौ.उषा सरदेसाई, नचिकेत सरनाईक, राजेंद्र आपुगडे, सचिन पांडव, शांताराम सुतार, महापालिका सर्वशाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षीका, विद्यार्थी विद्यार्थीनी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.