कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळा सुरु झाला आहे. शुक्रवारी समाधी परिसरामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजाचे जिवनावर चित्र रेखाटणेचा कार्यक्रम आयोजीत केला होता. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय, पद्माराजे विद्यालय, राजर्षी छत्रपती शाहू प्राथमीक विद्यालय, डॉ.दिपक साळोखे प्राथमिक विद्यालय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल याशाळेनी यामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये या शाळेतील बाल कलाकारांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजाचे जिवनावर चित्र रेखाटून कला सादर केली. विद्यार्थ्यानी उभेउभ राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावरील आधारीत काढलेली चित्रे पाहून उपस्थित महापौर ऍ़ड.सौ.सुरमंजिरी लाटकर व आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी भारावून गेले. यामध्ये 150 विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी सहभाग नोंदविला. तसेच कलाकार विजय टिपुगडे, अनिकेत मुळे, प्रसाद राऊत, विवेक कवाळे, आरिफ तांबोळी, समाधान हेंदळकर, शैलेश राऊत या चित्रकारांनी आपली कला यावेळी सादर केली. यामध्ये शाहू महाराज, शिवाजी महाराज, रंकाळा तलाव, समाधी स्मारक, राधानगरी धरण, गंगाराम कांबळेचे हॉटेल अशी चित्रे काढण्यात आली.
यावेळी महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ.अनुराधा खेडकर, प्रभाग समिती सभापती राजसिंह शेळके, नगरसेवक जय पटकारे, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, परवाना अधिक्षक राम काटकर, भांडार अधिक्षक सुनिल बिद्रे, लेखापाल प्राथमीक शिक्षण समिती राजीव साळोखे, सहा.उद्यान अधिक्षक अर्पणा जाधव, माजी नगरसेवक राजू लाटकर, आदिल फरास, नंदकुमार मोरे, श्रीकांत बनछोडे, रियाज सुभेदार, कादर मलबारी, ठेकेदार व्ही.के.सावंत, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, स्थापत्य अभियंता अभिजीत जाधव, संजय माळी आदिंनी या प्रदर्शनास भेट दिली.
या लोकार्पण सोहळया अंतर्गत शनिवार दि.18 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9.00 वाजता भवानी मंडप, तुळजाभवानी मंदिर येथून छत्रपती शाहू महाराज विचार दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची दिंडी भवानी मंडप-बिंदुचौक-आईसाहेब महाराज पुतळा-दसराचौक-राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक स्थळ या मार्गावरुन काढण्यात येणार आहे. तसेच शिर्के उद्यान येथे सकाळी 11.00 वाजता मर्दानी खेळ प्रात्यक्षिक, दुपारी 4.00 वाजता छत्रपती शाहू महाराज हेरिटेज वॉक व सायंकाळी 5.00 वाजता शाहिर रंगराव पाटील, राजू राऊत व इंचलकरंजीचे शाहिर संजय जाधव शाहिरी पोवाडेचे सादरीकरण करणार आहेत. तरी या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन महापौर ऍ़ड.सौ.सुरमंजिरी लाटकर व आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यानी आवाहन केले आहे.