कोल्हापूर /प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या सीएए ,एनआरसी,एनपीआर बहुजन विरोधी कायद्याच्या विरोधात उद्या मंगळवार दिं.२९ जानेवारी रोजी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत नागांवकर यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकारच्या सीएए, एनआरसी,एनपीआर कायद्याचा फटका देशातील एसटी, ओबीसी घटकांना बसणार असून हे दोन्ही घटक एकत्र येवू नयेत असा केंद्र सरकारचा घाट आहे. तर या कायद्याच्या माध्यमातून एसटी, ओबीसींना जबरदस्तीने हिंदू बनवण्याचे काम भाजप सरकारचे आहे. त्यामुळे याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने विविध प्रकारे तीन टप्प्यात आंदोलन सुरू आहे.त्यानुसार राज्यात धरणे आंदोलन, जिल्हा मुख्यालयावर प्रदर्शन रॅली असे आंदोलन करण्यात आले असून आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून मंगळवार दिं.२९ जानेवारी रोजी भारत बंद ठेवण्याचा इशारा संघटनेच्य पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
पत्रकार परिषदेला जिल्हा संयोजक महेश बावडेकर, महासचिव उमाजी जाधव, महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार संघटनेचे बाळासाहेब कांबळे, मौलाना बशीर,मनोहर चौगले यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.