कोल्हापूर/प्रतिनिधी :
डॉ. डीवाय पाटील हॉस्पिटल व स्पाईन फाउंडेशन यांच्यामध्ये करार झाला आहे.या कररांअतर्गत गरीब घराण्यातील लहान मुलांच्या मणक्याचे किंवा एखादे गुंतागुंतीचे ऑपरेशन मोफत केले जाणार आहे.या उपक्रमाचे उद्घाटन 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे या प्रसंगी स्पाईन फाऊंडेशनचे डॉक्टर शेखर भोजराणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.अशी माहिती डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल डॉ. प्रदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉक्टर पाटील यांनी यावेळी सांगितले डॉक्टर डीवाय पाटील हॉस्पिटल आणि मुंबई येथील स्पाईन फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करारांतर्गत दोन महिन्यातून एक दिवस मणक्याचे मोफत ऑपरेशन केले जाणार आहे.डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये ओपीडी नंबर 8 मध्ये प्रत्येक बुधवारी मणक्याची मोफत तपासणी होणार असून यातून ऑपरेशन करण्याची गरज असलेल्या रुग्णांची मोफत ऑपरेशन साठी निवड केली जाणार आहे त्यामध्ये डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल चे समिती संबंधित रुग्णाच्या घरची परिस्थिती पाहणी करून त्यानंतरच मोफत ऑपरेशनचा निर्णय घेतला जाणार आहे. याचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. यावेळी डॉक्टर सलीम लाड, डॉक्टर जावेद सागर अभिजीत पाटील आदी उपस्थित होते