कोल्हापूर – महानगरपालिकेत प्रत्येक महिन्याचा अखेरचा दिवस नो व्हेईकल डे दिवस पाळण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याची सुरवात डिसेंबर 2019 पासून करण्यात आली होती. आज जानेवारी महिन्यांचा शेवटचा दिवस असल्याने आज हा दिवस पाळण्यात आला. यावेळी विठ्ठल रामजी शिंदे चौकात कोणतेही वाहन नसलेने चौकाने रिकामा ʉाास घेतला. नो व्हेईकल डे मुळे शहरातील हवेचे प्रदुषण कमी होण्यास मदत होणार असून यासाठी आपण सर्वानी शहराची स्वच्छता करण्याचे काम जसे मनावर घेतले आहे. त्याप्रमाणे कोल्हापूर शहरवासीयांचा या नो व्हेईकल डे मध्ये सहभाग घ्यावा. शहरातील नागरिकांचा प्रत्येक चांगल्या कामात सहभाग असतो. त्याच प्रमाणे शहरातील नागरीकांनीही यात सहभाग घ्यावा असे महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.