मुंबई, २२ मार्च २०२१ : आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंड ने निफ्टी लो व्होल – ३० इटीएफ ही नवी फंड ऑफ फंड्स योजना जाहीर केली आहे. ही योजना येत्या २३ मार्च २०२१ ला खुली होईल आणि ६ एप्रिल २०२१ ला बंद होईल. या योजनेत निफ्टी १०० लो व्होलाटायलिटी ३० निर्देशांकाशी निगडित गुंतवणुकीत मिळणा-या उत्पन्नाशी समांतर उत्पन्न मिळवून देण्याचे (ट्रॅकिंग च्या त्रुटी वगळता) उद्दिष्ट आहे.
निफ्टी १०० या निर्देशांकात सहभागी असलेल्या शेअर पैकी ज्या शेअर च्या भावात सर्वात कमी चढउतार असतील त्या शेअरवर लक्ष ठेवून गुंतवणूक करून वादळी चढउतारांवर मात करीत संपत्ती उभारण्याच्या संधी या योजनेत उपलब्ध होतील. गेल्या पाच वर्षांत निफ्टी १०० लो व्होलाटायलिटी ३० निर्देशांकाने १२-१६ टक्के चक्रवाढ दराने उत्पन्न मिळवून दिले आहे. (म्युच्युअल फंड इंडस्ट्री एक्सप्लोरर च्या २८ फेब्रुवारी २०२१ आकडेवारीनुसार). ज्यांच्या कडे डी मॅट खाते नाही असे गुंतवणूकदारही या योजनेत एकरकमी किंवा एस आय पी पद्धतीने स्मार्ट बीटा इटीएफ मधून गुंतवणूक करू शकतील.
या योजनेविषयी आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल असेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री निमेश शाह म्हणाले, निफ्टी लो व्होल- ३० इटीएफ ही नवी फंड ऑफ फंड्स योजना गुंतवणूकदाराची शेअर चे भाव घसरण्याची जोखीम कमी करते. बाजारातील वादळी चढउतारांपासूनची जोखीम मर्यादित ठेवत सोप्या आणि सुलभ मार्गाने स्थिर ब्लू चिप कंपन्यांचे शेअर घेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मोठे भांडवल आणि स्थिर बाजारभाव असलेल्या विविध क्षेत्रातील ब्लू चिप कंपन्यांच्या शेअरमध्ये या योजनेतील निधी गुंतवला जाईल. फंड ऑफ फंड्स हे या योजनेचे स्वरूप असल्यामुळे रिटेल गुंतवणूकदार सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन चा पर्याय वापरून गुंतवणूक करू शकतील.
आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंड निफ्टी लो व्होल-३० इटीएफ फंड ऑफ फंड्स योजना आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंड निफ्टी लो व्होल-३० इटीएफ या योजनेत गुंतवणूक करील निफ्टी लो व्होलाटायलिटी – ३० निर्देशांकात निफ्टी १०० मधील, भावात सर्वात कमी चढउतार असलेले ३० शेअर समाविष्ट आहेत. यामध्ये सॉफ्टवेअर, पर्सनल केअर आणि सिमेंट या क्षेत्रांमधील शेअरमध्ये सर्वाधिक संख्येने आहेत. हा निर्देशांक दर तिमाहीला पुनर्रचित होतो.