मुंबई – ‘वेदिक्युअर हेल्थकेअर आणि वेलनेस सेंटर’ (एलएलपी) ने मागील दोन दशकांपूर्वीची आपली ओळख आता बदलली आहे. यासाठी आपल्या सर्व उत्पादनांची नवीन नावे आणि कंपनीचा लोगो आता नवीन स्वरूपात तयार केला आहे. सध्याच्या भविष्यातील स्पर्धेच्या दृष्टीकोनातून वेदिक्युअर हेल्थकेअर आणि वेलनेस सेंटरने ग्राहकांसाठी डिजिटलाइज्ड वैद्यकीय सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या केंद्राने आपल्या ब्रॅडला नव्या रूपात समोर आणला आहे. याशिवाय हा नवीन ब्रॅंड ग्राहकांची विश्वासार्ह जपण्यास प्रयत्नशील राहील.
कोविड-१९ नंतरची परिस्थिती लक्षात घेता ‘वेदिक्युअर हेल्थकेअर आणि वेलनेस सेंटर’ने नुकतेच तीन धोरणात्मक निर्णय घेतले आहे. यात दोन दशकांपूर्वीचा ब्रॅडला आता नवीन चेहरा देण्यात आला आहे. दुसरे म्हणजे, सीमामर्य़ादा तोडून रूग्णसेवेत वाढ करणे हा मुख्य उद्देश आहे. यासाठी कोविड-१९ प्रोटोकॉलचा वापर करून जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी रूग्णांना डिजिटलाइज्ड वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे. पॅन-इंडिया या सेवांचा विस्तार करण्यासाठी ऑनलाईन सल्ला आणि ऑनलाईनपद्धतीने औषध वितरणाची योजना आखत आहे. एका ऑफरमध्ये रूग्णांना परवडणाऱ्या किंमत उपचार उपलब्ध करून देण्याबाबत योग्य ते मुल्यांकन केले जात आहे.
‘वेदिक्युअर हेल्थकेअर अँण्ड वेलनेस’ (एलएलपी) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. समुद्रिका पाटील म्हणाले की, “आरोग्य सेवा वेगाने विकसित होत आहे आणि वेदिक्युअर या बदलाचा स्विकार करत स्वतःच्या कार्यक्षमतेला एक वेगळ वळणं देत आहे. नवीन लोगो हे त्याच्या नवीन ब्रँड उद्देशाचे आणि भविष्यातील उत्पादने आणि सेवांद्वारे ग्राहकांना ऑफर देण्याचे वचन देणार्या मूल्यांचे प्रतीक आहे. लोगोचा रंग नैसर्गिक हिरवा आहे, जो आयुर्वेदाच्या मार्गाने उपचारांचे प्रतिनिधित्व करतो. ग्राहक आणि आमच्या कर्मचार्यांना आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व लोकांची सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळावी, या अनुषंगाने कंपनीचा लोगो तयार करण्यात आला आहे. याशिवाय “Leading You to Better Health!” हे नवीन घोषवाक्य रूग्णांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या टीमला समर्पित करण्यात येत आहे.”
डॉ. पाटील पुढे म्हणाले, “रुग्णांची योग्यरितीने काळजी घेण्याच्या उद्देशाने या ब्रँडचे नूतनीकरण करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून संयुक्त उपचारपद्धतीद्वारे रूग्णांवर उपचार केले जात आहे. जुन्या रूग्णांची सेवा केली जात आहे. परंतु, आता नव्या उत्साहाने नवीन सेवा देण्यास आम्ही सज्ज आहेत. यासाठी नव्या पिढीमध्ये या उपचारपद्धतीबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
‘वेदिक्युअर वेलनेस व संयुक्त उपचार’ पद्धतीबाबत जाणून घेऊया…
वेदिक्युअर वेलनेस व संयुक्त उपचार पद्धतीतून प्राचीन भारतीय व अर्वाचीन औषधांचा समन्वय साधला जातो. प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. अनिल पाटील यांनी प्रवर्तित केलेले हे तंत्र रोगाच्या लक्षणाऐवजी रोगाच्या मुळावर उपचार करण्यावर भर देते. वेदिक्युअर हेल्थकेअर आयुर्वेद आणि आधुनिक औषधाच्या पारंपारिक रोग उपचार पद्धतीचा विरोध न करता लोकांना बरे करण्यासाठी वैयक्तिकरित्या सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. वेदिक्युअर जागतिक स्तरावर रूग्णांना सुरक्षितता, गुणवत्तापूर्ण व परवडणाऱ्या दरात उपचार देण्यास प्रयत्नशील आहे. संयुक्त उपचारपद्धत संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य आणि लोकप्रिय आहे. पंचकर्म, आयुर्वेद, एक्युपंक्चर, निसर्गोपचार आणि फिजिओथेरपी यांसारख्या निरनिराळ्या उपचारांचा वापर संयुक्त उपचारपद्धत म्हणून केला जातो