१५ दिवस अंथरूनावर खिळुन असलेल्या पुष्पा कुलकर्णी यांच्या वर सुरु केले उपचार
महिनाभर उपचार अवश्यक, मोफत उपचाराची तयारी: फक्त प्रवास खर्चाची समस्या
कोल्हापूर: गेल्या १५ दिवसा पासून ती माऊली अंथरूनावर खिळुन् होती, पाठीच्या मनक्याच्या आजाराने त्रस्त होती, त्यांचा एकुलता एक मुलगा शेखर तोही दिव्यांग. त्यामुळे कोणी कोणाला पहायाचं, हा सवाल आ वासून होता उभा. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यात आपली जवळची नातेवाईक कोणीच नाही. गेले १५ दिवस श्रीमती पुष्पा कुलकर्णी
मदती साठी टाहो फोडत होती. वेदना सहन करुन् त्यांचा जीव वर आला. अशा वेळी
त्यांच्या शेजारी राहणारे माझे शिक्षक प्रा.पाटील सर हेच काय त्यांचा एकमेव आधार होते. त्यांच्या हाकेला ओ ते नेहमी देतात, ते हि कॉलेज व आपला व्याप सांभाळून…मध्यन्तरि त्यांनीच एका दवाखान्यात कुलकर्णी यांना ऍडमिट केलं. कोरोना काळात सरकारी दवाखान्यात उपचार करण अशक्य होत, खाजगी दवाखान्यात उपचारा साठी स्व्यब तपासणी आवश्यक होती, त्यासाठी पाटील सर यांनी त्या दिवशी
दिवसभर प्रयत्न केला. त्या दिवशी हे कामं पण नाही झालं आणि त्यांना ऍडमिट हि करता आलं नव्हतं.
तत्पुर्वि त्यानी सिद्धगिरी मध्ये १०८ रुग्ण वाहिकेतुन् कुलकर्णी यांना
नेले. मात्र तीथ त्यांच्या वरील ऑपरेशन साठी
सुमारे ८० हजार चा खर्च सांगितला तर अथायु मध्ये ४० हजार खर्च येणार असल्याच सांगितलं. अशा परिस्थितीत मी त्यांच्या परिस्थिती बाबतचि माहिती समाज माध्यमावर दिली. त्या नंतर पत्रकार कमलाकर वरटेकर यांनी मला
अक़ुप्रेशरिस्ट विद्यालक्ष्मी राजहंस यांच्याशी मला संपर्क साधून दिला. विद्या लक्ष्मी यांनी माझ्या कडून त्यांचा रिपोर्ट मागून घेतला.
कुलकर्णी यांचा पत्ता घेऊन त्यानी काल् राम नवमी दिवशी भेट दिली. त्या ठिकाणी त्यांच्या वर उपचार केले. या उपचार मुळे त्यांच्या जीवात जीव आला. त्यांच्या वेदना थोडया का असेना, कमी झाल्या. या पेक्षा एक माणुस आपल्या घरी येऊन आपल्यावर मनोभावे उपचार करते आहे, याचा श्रीमती कुलकर्णी यांना अधिक आनंद झाला. दरम्यान, विद्या लक्ष्मी यांनी मला सांगितलं कि, श्रीमती कुलकर्णी यांच्या वर किमान महिना भर
उपचार होणे आवश्यक आहे, ऑपरेशनची
गरज वाटत नाही. या उपचार मुळे त्या बऱ्या होऊ शकतात.
असे असले तरी विद्या लक्ष्मी या फुलेवाडीत राहतात. त्या दररोज जरग्नगर मध्ये जाऊन उपचार करतील. त्यांच्या प्रवास खर्चाचा आता प्रश्न् आहे, तोही आता सुटू शकेल, अशी मला खात्री आहे. कारण मदतीचे हात आता पुढे येऊ लागले आहेत.