आज जागतिक पुस्तक दिन आहे. प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर याच्या स्मरणार्थ 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. या जागतिक पुस्तक दिनानिमित्त हा लेख , लेखक सतिश वडणगेकर
पुस्तके माणूस आणि समाज घडवतात व्यक्तिमत्व सुंदर चेहऱ्यावर अवलंबून नसते तर आचार विचार आणि चांगल्या संस्कारातून घडते जो ज्ञानवंत, बहुश्रुत, आत्मविश्वासी,विनयशील, चेहऱ्यावर बुद्धीचे तेज असते त्याचे व्यक्तिमत्व सुंदर असते. प्रत्येकाच्या आवड-निवड ही वेगवेगळी असतात .प्राचीन काळापासून ही पुस्तक निर्माण होत आले आहेत. रामायण- वाल्मिकी, महाभारत- व्यास, ज्ञानेश्वर- ज्ञानेश्वरी, दासबोध- रामदास स्वामी, स्वामी विवेकानंद, अनेकांनी ग्रंथ लिहिली आणि तीच परंपरा सुरू राहिले.लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिराव फुले ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी,डॉ.अब्दुल कलाम या बरोबर मराठीतील प्रसिद्ध लेखक आणि त्यांची पुस्तकं पुल देशपांडे – बटाट्याची चाळ,साने गुरुजी – श्यामची आई, वि. स. खांडेकर – हिरवा चाफा, वि वा शिरवाडकर – नटसम्राट, आहे आणि नाही ,विश्वास पाटील – झाडाझडती,वि ग कानिटकर – नाझी भस्मासुराचा उदयास्त,शिवाजी सावंत – युगंधर,छावा,शिव खेरा, यश तुमच्या हातात,भालचंद्र नेमाडे, कोसला,श्याम मराठे, यशाची गुरुकिल्ली,अभ्यासाची सोपी तंत्रे, मनोरंजक शून्य ,प्रल्हाद केशव अत्रे (प्र के अत्रे) – डॉ. लागू, झेंडूची फुले, कर्हेचे पाणी, तो मी नव्हेच,वसंत पुरुषोत्तम काळे (व. पु. काळे) – गुलमोहर, काही काही खोटं, घर हलवलेली माणसं, तप्तपदी,चिंतामण त्र्यंबक खानोलकर (आरती प्रभू) – एक शून्य बाजीराव (नाटक), कालाय तस्मै नमः (नाटक),कोंडुरा (कादंबरी),विवा,शिरवाडकर (कुसुमाग्रज) – फक्त लढ म्हणा (कविता), जीवनलहरी, किनारा, महावृक्ष,राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) – एकच प्याला, प्रेमसन्यास, भावबंधन, असे असंख्य पुस्तक लिहिले आहेत., लिखाण चाललेले आहेत. अनेक नवीन लेखक तयार होत आहेत. ज्यांनी इतिहास लेखनातून कृती मधून घडवला.खरतर वाचन हा एक संवाद आहे. वाचनाने ज्ञानप्राप्ती, मनोरंजन, बौध्दिक, शब्द संपत्ती ज्ञान,एकाग्रता, प्रोत्साहन, तणावापासून सुटका आणि मानसिक विकास अशा अनेक गोष्टी साध्य होतात. एकदा वाचनाची गोडी लागली की ही वाचन भूक उत्तरोत्तर वाढत जाते आणि वाचनाचं व्यसन लागत जातं, अर्थात हे व्यसन असणं चांगलंच. तंत्रज्ञान आणि ‘ई-बुक’ मुळे विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची गोडी कमी होत असल्याचे सत्य कोणीही नाकारू शकत नाही, इंटरनेट, मोबाइलच्या या जमान्यात नव्या पिढीने पुस्तकांकडे जणू पाठच फिरवली आहे. सध्या मोबाइलवर अनेक अॅप उपलब्ध आहेत इंटरनेटवर कोणत्याही शब्दाचा अर्थ चटकन मिळतो. अनेकदा या तरुण पिढीला पुस्तक वाचणं बोअरिंग वाटतं. इंटरनेटवर कोणतीही माहिती मिळून जाते ना मग पुस्तक का वाचायचं असं सध्याच्या पिढीला वाटतं. त्यामुळे सध्या पुस्तक वाचण्याकडे तरुणांचा कल कमी झाला आहे. जो तो मोबइलमध्ये बिझी झाला आहे. आपण जशा इतर गोष्टींची सवय लावतो, त्याप्रमाणे पुस्तक वाचनाचीही सवय लावली तर त्यात कुठे नुकसान आहे. तरुण पिढी वाचत नाही, असा आक्षेप सतत घेतला जातो. पण तरुण पिढीने वाचावं, अशी ‘वाचन-संस्कृती’ आपण त्यांच्यात रुजवलीय का? तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी काय करायला हवं? तर शाळा-महाविद्यालयांच्या पातळीवर तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. त्या अनुषंगानं लेखक-भेटी, मुलाखती, वाङ्मयीन कार्यक्रम,साहित्यसंमेलन, वाचन प्रेरणा दिन’. त्यांना ज्या विषयाचे आवड आहे त्या विषयाचे पुस्तक प्रकाशन मध्ये पुस्तक ठेवावेत तसेच लहान मुलांच्या बाबतीत आणलेल्या पुस्तकांचे घरातल्या शक्य असतील त्या लहानमोठ्या सदस्यांना सोबत घेऊन सामुदायिक वाचन करणे. वाचताना आपल्याला जसे जमतील तसे ( जरा जास्तच ) हावभाव करून दाखवणे. जेणे करून पुस्तकांमध्येही गंमतजंमत असते, ही जाणीव त्यांना होईल.घरात इथे तिथे पुस्तके “टाकून” द्यावीत, जेणे करून येता जाता कधीतरी का होईना मुलांची त्यांच्याशी टक्कर होईल.सुरवातीला वृत्तपत्र किंवा मासिक यापासून तुम्ही सुरवात करू शकता. तुम्हाला कळतच नसेल की तुम्हाला नक्की काय वाचायला आवडेल, तर वर्तमानपत्रात तुम्हाला सामाजिक, आर्थिक, ललित, निबंध, बातम्या सर्व स्वरूपाचे वाचन साहित्य वाचायला मिळेल. त्यातून तुम्हाला काय आवडते ते वाचणे सुरु ठेवा आणि त्या विषयासंबंधीची पुस्तके, शोधनिबंध अशा अनेक गोष्टी तुम्ही मिळवून तुम्ही वाचू शकता. पुस्तके वाचल्यामुळे भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो.,चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागतात., प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो.,चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते.योग्य वेळी योग्य बोलता येते.,शब्दाची धार कळते.,आई वडिलांची किंमत कळते, समाज आणि आपण हे कळते, यश-अपयश यातील फरक कळतो, पुस्तक हे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवते.थोर व्यक्तींनी सांगितले आहे.जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाची पुस्तक घ्या कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कस जगायच हे शिकवेल,पुस्तक म्हणजे जागृत देवता आहे त्याची सेवा करून त्वरित वरदान मिळवता येते , झेप घेणाऱ्या पंखांना ज्ञानाचं बळ देणारी… पुस्तके…जीवनात आनंदाचे सप्तरंगही उधळतात,एक मंदिर बांधणे म्हणजे एक हजार भिकारी तयार करणे आणि एक ग्रंथालय बांधणे म्हणजे लाखो विद्वान निर्माण करणे होय.,पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही हे पुस्तक म्हणजे सल्लागार पुस्तक म्हणजे संयमी शिक्षक, पुस्तक आणि चांगली माणसं लगेच कळत नाही त्यांना वाचावं लागतं म्हणून पुस्तक माणूस आणि समाज घडवते.चला मग आयुष्य सुंदर आणि सक्षम करण्यासाठी जसं होईल तसं वेळ काढून पुस्तकं वाचूया जेणें करून आपलं जीवन अर्थपूर्ण आणि समृद्ध बनवू युवासम्रुद्ध भारताचे स्वप्न पाहूया!.आणि जागतिक पुस्तक दिनाला नेहमी शुभेच्छा देऊया.