कोल्हापूर ता. 03 : गंगावेश सुवर्णा कॅफे परिसरात नागरीकांची सोमवार दि.03 मे 2021 रोजी मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. यावेळी संभाजी नगर येथील एका नागरीकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरामध्ये संचारबंदी आहे परंतू अत्यावश्यक कामाच्या नावाखाली नागरीक गर्दी करत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी महापालिकेच्यावतीने मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात येत आहे. गंगावेश परिसरात 100 नागरीकांची मोबाईल् व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 99 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर संभाजीनगर येथील 1 नागरीकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.