अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सुरु ठेवल्याने 7 दुकानांवर दंडात्मक कारवाई
कोल्हापूर, दि. 03 :- जोतीबा रोडवरील स्वर्ग ज्वेलर्स व शिवाजी रोडवरील मनोज इलेक्ट्रीकल्स व होम ॲप्लायसेन्स या तीन दुकानदारांनी आपला व्यवसाय सुरु ठेवल्याने त्यांची दुकाने परवाना विभागाच्यावतीने आज सील करण्यात आली. तर आईसाहेब महाराज पुतळा पसिरातील तथास्तु शॉपी मॉल, राजारामपुरी येथील मनमंदिर, करवीर क्रिएशन, गुजरी महादेव गल्लीतील जितेंद्र गर्डे यांचे ज्वेलर्सचे दुकान, आरोहि क्रियेशन, जोतीबा रोडवरील महालक्ष्मी कलेक्शन व महालक्ष्मी वस्त्रविहार या 7 दुकानांवर दंडात्मक कारवाई करुन 40 हजार दंड वसूल करण्यात आला.
शहरामध्ये शासनाच्या आदेशानुसार धान्य लाईन, भाजी विक्रेते, बेकरी, किराणा दुकान, दुध विक्रेते यांना सकाळी 11 वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. सकाळी 11 नंतर फक्त अत्यावश्य सेवा असणा-या दुकान दारांनाचा परवानगी देण्यात आलेली आहे. या शासन निर्देशाचे पालन करण्यासाठी महापालिकेच्यावतीने पाच भरारी पथके स्थापन केलेली आहेत. या पथकामार्फत शहरामध्ये विविध ठिकाणी फिरती करुन दुकाने बंद असलेबाबत तपासणी केली जात आहे. परंतु सकाळी धान्य लाईन, भाजी विक्रेते, बेकरी, किराणा दुकान, दुध विक्रेते यांच्या व्यतिरिक्त इतर व्यवसाय सुरु असलेचे या भरारी पथकास निदर्शनास आले. यावेळी पहिल्यांदा सुचना देऊनही पुन्हा दुकान उघडे असलेचे आढळल्याने स्वर्ग ज्वेलर्स, मनोज इलेक्ट्रीकल्स व होम ॲप्लायसेन्स ही तीन दुकाने सील करण्यात आली. त्याचबरोबर आईसाहेब महाराज पुतळा पसिरातील तथास्तु शॉपी मॉल (रु.15000/-), राजारामपुरी येथील मनमंदिर(रु.8000/-), करवीर क्रिएशन (रु.5000/-), गुजरी महादेव गल्लीतील जितेंद्र गर्डे यांचे ज्वेलर्सचे दुकान (रु.5000/-), आरोहि क्रियेशन (रु.2000/-), जोतीबा रोडवरील महालक्ष्मी कलेक्शन (रु.5000/-) व महालक्ष्मी वस्त्रविहार (रु.5000/-) या 7 दुकानदारांना सक्त ताकीद देऊन दंडात्मक कारवाई करुन 40 हजार रुपये वसूल करण्यात आले. यावेळी इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर, पंडीत पवार व कर्मचारी उपस्थित होते.