कोल्हापूर ता.25 : शेंडा पार्क येथील चेतना बाल विकास मंदीरमधील 18 वर्षावरील 62 जणांना महापालिकेच्यावतीने पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले. चेतना बाल विकास मंदीर या संस्थेच्यावतीने महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांना लसीकरणाबाबत विनंती केली होती. सदरची विनंती प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी मान्य करुन संस्थेमध्ये विशेष कॅम्पद्वारे लसीकरण करणेबाबतचे निर्देश आरोग्याधिकारी यांना दिले होते. त्याप्रमाणे शुक्रवारी सदरचे लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. या लसीकरणाचा शुभारंभ प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रशासक डॉ.कादंबर बलकवडे यांनी येथील मुलांची भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळे पणाने संवाद ही साधला.
यावेळी उप-आयुक्त निखिल मोरे, वैद्यकिय अधिकारी डॉ.अर्पिता खैरमोडे, चेतना बाल विकास मंदीरचे अध्यक्ष नरेश बगरे, उपाध्यक्ष डॉ.सुनिल पाटील, कार्यकारी अध्यक्ष पवन खेबुडकर, मुख्याध्यापक उज्वला खेबुडकर, व्यवस्थापक अधिक्षक चौगुले व प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वैद्यकिय कर्मचारी उपस्थित होते.