कुरुंदवाड येथील प्रभाग क्रमांक पाच मध्ये लाखो रुपयांची विकासकामे केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने सिमेंटचे रस्ते, काँक्रिटीकरण, गटारी आदी कामांचा समावेश आहे. यासाठी नगराध्यक्ष जयराम बापू पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. शहरातील ईदगाह मैदाना करिता वाढीव जागा मिळविण्यासाठी जिल्ह्याचे पालक मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या सहकार्याने प्रयत्न चालू आहेत. अशी माहिती नगरसेविका सौ समरीन शकील गरगरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कुरुंदवाड शहरातील प्रभाग क्रमांक पाच हा शहराच्या पूर्वेला आहे या प्रभागात चिलखी विभागातील सिटी सर्वे नंबर 478 चा मोठा भाग येतो. या भागात गल्लीबोळ जास्त आहेत. सर्वसामान्य शेतमजूर, यंत्रमागधारक आदींची वस्ती या ठिकाणी आहे. मी निवडून आल्यानंतर याप्रभागातील नागरिकांना मूलभूत सोयी, सुविधा मिळाव्या यासाठी प्रयत्न केले. वीज, पाणी या सुविधा पुरविल्या. सार्वजनिक रस्त्यावरील दिवाबत्तीची जागोजागी व्यवस्था केली. मुबलक स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न केले आहेत. नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सांडपाण्याचा निचरा चांगला होणे गरजेचे असल्याने या प्रभागातील बहुसंख्य गटारीचे काम केले आहे.त्याचप्रमाणे सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार केले आहेत. अशी लाखो रुपयांची विकास कामे केली आहेत. प्रामुख्याने पावसाचे रस्त्यावर पडणारे पाणी गटारीत पडून जाईल याची दक्षता घेतली आहे. या कामी नगरसेवक फारुख जमादार यांचे मोलाचे सहकार्य आहे. शहरातील ईदगाह मैदानाची जागा मुस्लिम बांधवांना सार्वजनिक नमाज पठणासाठी वाढवून मिळावी ही मुस्लिम बांधवांची मागणी आहे. वाढीव जागेसाठी पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत.माझे सासरे गुलाब गरगरे यांचा समाजकारण करण्याचा वसा आमच्या घराण्यावर व माझ्यावर आहे. महापुराच्या संकटकाळात सर्वसामान्य माणसांना सुरक्षित स्थळी हलविणे, त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविणे, अन्नदान करणे आदी माध्यमातून मदत केली आहे. माझ्या सार्वजनिक कार्यात विकास कामे करण्यासाठी काशीराम भोई, शंकरराव गायकवाड आनंदा पवार, अखिल गोलंदाज, शंकर पाटील, कै.अरुण जाधव, श्रीकांत माळी, कै. हसन गोलंदाज आदींचे सहकार्य लाभले आहे.