गोकुळ शिरगाव:प्रतिनिधी – पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग वरील महालक्ष्मी नगर समोर ,शाहू उड्डाणपूल संपते या ठिकाणी गुरुवारी रात्री-८:४५ दरम्यान
MH0९-इ क्यू ५०६३ या मोटरसायकल वरील तुषार बबन मुळीक (रा.उचगाव) हा गाडीवरून जात असताना ५०० मीटर गाडी घसरत जाऊन स्लिप होऊन गसरून पडला .त्याच्या डाव्या पायाला,डोक्याला,हाताला जबर मार लागला. यावेळी महालक्ष्मी नगर येथील रोहित सातपुते, अक्षय गावडे,निखिल सुतार यांच्या सहकार्याने महामार्ग मृत्युंजय दूत मोहन सातपुते यांनी तुषार मुळीक यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला तर उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश नलवडे व पोलीस कर्मचारी यांना फोनव्दारे अपघाताची माहिती दिली. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सुरेश नलवडे यांनी रुग्णवाहिका तातडीने पाठवून दिली.तुषार यास उचगाव मधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वेळीच अपघात समयी मदतकार्य केल्यामुळे तुषारचा जीव वाचविण्यास मदत झाली.
विषेश म्हणजे गाडी स्लिप होऊन रस्त्यावर पडला यावेळी पाठीमागून कोणतेही अवजड वाहन वेगाने आले नव्हते आले असते तर मोठा अनर्थ घडला असता. तुषारचे दैव बलवन्तर म्हणून वाचले प्राण.तुषार वर झालेला वैद्यकीय उपचार मुळे त्याच्या घरच्या मंडळींनी मोहन सातपुते यांचे आभार मानले आहेत