पुणे – आपल्या सर्वांना माहिती आहे की, महाराष्ट्र राज्य शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीमध्ये, गेली कित्येक वर्षे देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.
ह्याला “नापिकी” असे ठरलेले कारण देऊन दिशाभूल केली जाते. प्रत्यक्षात मागील दोन सपशेल फेल गेलेल्या कर्जमाफी योजना, ज्यामध्ये अनेक क्लिष्ट अटी, शर्ती व निकष होते, हे महत्त्वाचे एक कारण आहे.
तसेच दुसरे महत्वाचे कारण, शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न देणाऱ्या जोडधंदा- दुग्ध व्यवसायात वर्षानुवर्षे होत असलेली लूट हे आहे.
या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही “धवलक्रांती संघर्ष” हे अभियान सुरू केले आहे.
23 जूनला पुण्यामध्ये आम्ही पत्रकार परिषद घेऊन, ह्या प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले.
सर्व दुध उत्पादकांना पुन्हा आम्ही आवाहन करीत आहोत की आपण 27 जुन, रविवारी रोजी शहराकडे जाणारा दुध पुरवठा बंद करा. तसेच संकलन केंद्रात दुध देऊ नका. बिगर दूध उत्पादक ग्रामस्थांनी दूध खरेदी करून सहकार्य करावे व शेतकऱ्यांच्या दुधाचा एक थेंबही वाया जाऊ देऊ नका.
एक दिवस तरी’ आपल्या लेकरांना, आजी-आज्यांना दुध आटवुन, बासुंदी खवा खाऊ घाला.*
शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत धवलक्रांती संघर्ष थांबणार नाही.*
पाठींबा दर्शविण्यासाठी खालील फोन नंबर वर “Yes I will” किंवा “हो, मी पण” असा एसएमएस (SMS) मला पाठवा.
सोबतः माझा व्हिडीयो व पत्रकार परिषदेचा फोटो
#धवलक्रांती_संघर्ष
सतीश देशमुख, B.E. (Mech) पुणे (9881495518) अध्यक्ष, “फोरम ऑफ़ इंटलेकच्युअल्स”.