उचगाव:कॉम्रेड कै.गोविदराव पानसरे (आण्णा) यांचे निर्भयपणाचे संस्कार आणि माजी आरोग्यमंत्री कै. दिग्विजय खानविलकर यांचे उपकार , उचगाव बिटच्या सेविका-मदतनीस यांचे सहकार्य यामुळेचं पर्यवेक्षिका म्हणून गाव-खेड्यातील अंगणवाडी केंद्रातील सेविकाचे प्रश्न पोटतिडकीने सोडविले.उचगाव बीटमध्ये सर्व अंगणवाड्या स्मार्ट झाल्या आहेत. यातून उतराई होण्यासाठी सेविका-मदतनीस यांनी केलेला सत्कार प्रेरणादायी आहे.असे मत उचगाव बिटच्या पर्यवेक्षिका सुरेखा कदम यांनी व्यक्त केले.
उचगाव (ता.करवीर )येथील सर्व अंगणवाडी सेविका- मदतनीस यांच्या तर्फे आयोजित सत्कार समारंभ व सेवानिवृत्त कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य महेश चौगुले होते.यावेळी माजी सभापती सुनील पोवार,संतोष माने,उपसरपंच मधुकर चव्हाण,विनायक जाधव,सचिन देशमुख,उर्मिला वद्देर ,यांनी मनोगत व्यक्त केले.
उचगाव येथील सर्व सेविकाच्या हस्ते पर्यवेक्षिका सुरेखा कदम व अंगणवाडी कार्यकर्ती प्रशिक्षण केंद्राचे माजी निदेशक मोहन सातपुते यांना आदर्श शिक्षक-समाजसेवक या गुरू- शिष्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच जिल्हा परिषदेचा राजर्षी शाहू पुरस्कार पर्यवेक्षिका सुरेखा कदम यांना व अंगणवाडी सेविका रेखा पाटील, सविता माने यांना जि. प. चा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार मिळाल्या बद्दल व अंगणवाडी सेविका शुभांगी कुंभार यांना स्मार्ट अंगणवाडी साहित्य मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास उचगाव बिटच्या सर्व सेविका-मदतनीस, सरपंच मालूताई काळे,दीपक रेडेकर,ग्रा.प.सदस्या जयश्री रेडेकर, संगीता दळवी,कामगार नेते सुरेश केसरकर ,विठ्ठल कदम,सचिन गाताडे,सुभाष निगडे ,दीपक काळे, दीपक रेडेकर,अजित कांबळे,विनायक जाधव, पोलीस पाटील स्वप्नील साठे,मीना पवार,सुरेखा मोरे, मीना सूर्यवंशी, राजश्री जाधव,पदमजा माने,महादेवी स्वामी,पदमजा माने,कमल क्षीरसागर, फुलताई टाफळे, साधना कांबळे,छाया साठे,सुरेखा चोगुले, मीनाक्षी मोहिते,वंदना लोहार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक स्नेहल सांगलीकर व आभार मोहन सातपुते यांनी मानले.