कोल्हापूर -२९ –कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या संचालक मंडळ मिटिंग मध्ये राधानगरी तालुक्यातील राशिवडे बु गावाच्या कु.साईप्रसाद विष्णू पाटील यांची भारतीय सैन दलात पंजाब रेजिमेंट (पश्चिम बंगाल) येथे लेफ्टनंट पदी निवड झाल्याबद्दल गोकुळच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन मा.विश्वास पाटील (आबाजी) यांनी देशसेवा करण्यासाठी साईप्रसाद याचा आदर्श घेऊन ग्रामीण भागातील तरुणांनी सैन्य दलात फक्त भरती होण्यापेक्ष्या सैन्य दलातील अधिकारी होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील राहावे. असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी सत्कारला उत्तर देताना साईप्रसाद म्हणाला कि,. “ महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य आणि माझ्या कोल्हापूर भूमितील गोकुळ दुध संघात होणारा माझा सत्कार हा माझ्यासाठी अभिमानास्पद व ग्रामीण भागातील तरुणासाठी प्रेरणादायी आहे.” असे उद्गागार त्यांनी याप्रसंगी काढले. माझी भारतीय सेना दलात अधिकारी पदावर जाऊन देश सेवा करण्याची स्वतःची जिद्द होती ती आज पूर्ण झाली.याचा आनंद मला व माझ्या कुटुबियांना आहे.माझ्या या यशात कुटुंबातील माझे वंदनीय आई –वडील ,चुलते प्रा.जालिंदर पाटील, व इतर नातेवाईक ,मित्र मंडळी याची मोलाची साथ लाभली. माझे प्राथमिक शिक्षण राशिवडे येथे व माध्यमिक शिक्षण सैनिक स्कूल सातारा येथे झाले.त्यानंतर नेशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) येथे निवड झाली.तीन वर्षे खडकवासला व एक वर्ष डेहराडून येथे ऑफिस ट्रेनिंग पूर्ण केले व माझी भारतीय सैन दलात पंजाब रेजिमेंट (पश्चिम बंगाल) येथे लेफ्टनंट पदी निवड झाली .यापुढे कोल्हापुरचे लेफ्टनंट जनरल एस.पी.थोरात यांचा सैन दलाच्या पटलावरील अधोरेखित वारसा पुढे चालवणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ संचालक अरुण डोंगळे,अभिजित तायशेटे,अजित नरके ,नवेद मुश्रीफ,शशिकांत पाटील–चुयेकर,किसन चौगले,रणजीत पाटील,नंदकुमार ढेंगे,कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले,एस.आर.पाटील,प्रकाश पाटील,डॉ.सुजित मिणचेकर,अमरसिंहपाटील,बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, अंबरीषसिंह घाटगे,चेतन नरके,श्रीमती अंजना रेडेकर व सौ शौमिका महाडिक,कार्यकारी संचालक,बोर्ड सेक्रेटरी व संघाचे अधिकारी उपस्थित होते.